ICC ODI World Cup 2023, Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात आगळावेगळा विक्रम नावावर केला आहे. विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारताचा फिल्डर म्हणून विराट कोहलीने विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नई येथे मिचेल मार्श याचा झेल घेऊन विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली आता विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय फिल्डर झाला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. आता हा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. 


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसल्याचे तिसऱ्याच षटकात स्पष्ट झाले. जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला शून्यावर तंबूत पाठवले. मिचेल मार्शच्या बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू विराट कोहलीने पकडला. विराट कोहलीने अप्रतिम झेल घेत मार्शचा डाव संपवला. विराट कोहलीचा हा विश्वचषकातील 15 वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. 




विराट टॉपवर


विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत. 


विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक झेल घेणारे फिल्डर्स - 


विराट कोहली 27 डावात 15 झेल


अनिल कुंबळे 18 डावात 14 झेल


कपिल देव 25 सामन्यात 12 झेल


सचिन तेंडुलकर 44 डावात 12 झेल


विरेंद्र सेहवाग 22 सामन्यात 11 झेल


अझहर 19 डावात 11 झेल


झहीर खान 23 डावात 10 झेल


सुरेश रैना 12 डावात 10 झेल


के श्रीकांत 22 डावात 9 झेल


उमेश यादव 8 डावात 8 झेल


विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरोधात रेकॉर्ड - 


विराट कोहलीने वनडे फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 45 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये   53.1 च्या शानदार सरासरीने 2,228 धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीने आठ शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकाविरोधात ठोकल्या आहेत. श्रीलंकाविरोधात कोहलीने 50 सामन्यात 62.7 च्या सरासरीने 2506 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजविरोधात कोहलीने 41 सामन्यात 66.55 च्या सरासरीने 2261 धावा चोपल्या आहेत. म्हणजेच, वनडेमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाविरोगात तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत. विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.