Shane Watson On ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. पाच ऑक्टोबरपासून रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात आठ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथील मैदानातून होणार आहे. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडू शेन वॉटसन याने मोठे भाकित केलेय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे विश्वचषकाची फायनल होईल, असे वॉटसन म्हणालाय. 


शेन वॉटसन याच्या मते गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियन संघाला निश्चितच काही समस्यांचा सामना करावा लागला आहे, पण पुढे कसे जायचे हे संघाला माहीत आहे. आता सर्व प्रमुख खेळाडू विश्वचषकासाठी जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. संघात निवडलेल्या सर्व खेळाडूंना विश्वचषकासारख्या स्पर्धेत कसे खेळायचे हे माहितेय.



शेन वॉटसनने आपल्या वक्तव्यात भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचेल, असा अंदाज वर्तवलाय.  तो म्हणाला की, टीम इंडियाला घरच्या मैदानावर खेळण्याचा नक्कीच फायदा होईल. कारण त्यांना येथील परिस्थिती चांगली माहिती आहे. त्याच्या फलंदाजीसोबतच आता त्याची गोलंदाजीही जोरदार दिसते आहे, ज्यामध्ये कुलदीप यादवच्या कामगिरीने आपण सर्वजण प्रभावित झालो आहोत.


पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एश्टम एगर, अॅलेक्स खॅरी, नॅथन एलस, कॅमरुन ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेलवडून, ट्रेविस हेड, जोश इंग्लिंस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, अॅडम झाम्पा


भारताचा विश्वचषकासाठी संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार) शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकाचे वेळापत्रक - 


8- ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चेन्नई
13- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ
16- ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड - लखनौ
20- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगलोर
25- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - दिल्ली
28- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला
4- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - अहमदाबाद
7- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान - मुंबई
12- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे