IND vs AUS 2nd ODI LIVE Score Updates: इंदौर येथील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. नियमित कर्णधार पॅट कमिन्सला आराम दिला. अनुभवी स्टिव्ह स्मिथ नाणेफेकीसाठी मैदानात आला होता. स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करम्याचा निर्णय घेतला. यजमान भारताला स्मिथने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताच्या संघात एक बदल करण्यात आला. तर ऑस्ट्रेलियाच्या संघातही बदल करण्यात आले आहेत.
जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. कौटंबिक कारणामुळे जसप्रीत बुमराहने दुसऱ्या वनडेमधून आराम घेतला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श, कर्णधार पॅट कमिन्स, मार्कस् स्टॉयनिस यांना आराम दिलाय.
मोहाली येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. आज सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभवाचा वचपा काढणार की भारत मालिका जिंकणार... याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पाहा आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात कुणाला स्थान मिळालेय...
भारताचे ११ शिलेदार -
शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), इशान किशन, रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव,. शार्दूल ठाकूर, आर. अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शामी
ऑस्ट्रेलियाचे ११ खेळाडू कोणते ?
डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नश लाबुशेन, जोश इंग्लिश, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, एडम जम्पा, जोश हेजलवुड, स्पेंसर जॉनसन.
कुठे पाहाल सामना ?-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमा अॅपवर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 आणि डीडी स्पोर्ट्स या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.
खेळपट्टी कशी ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी इंदौरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला मदत मिळू शकते. रविवारी होणाऱ्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजाना अडचणीत टाकू शकतात.
दुसऱ्या वनडेत मुसळधार पावसाचा अंदाज -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर रोजी इंदौरध्ये ढगाळ वातावरण असेल. सायंकाळनंतरही इंदौरमध्ये पावसाची शक्यता आहे. इंदौरमध्येही सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.