एक्स्प्लोर

World Cup 2023 : मॅक्सवेल होता म्हणून ऑस्ट्रेलिया जिंकली, बिग शोचं ऐतिहासिक द्विशतक

AUS vs AFG, Match Highlights : दुखापतग्रस्त असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

AUS vs AFG, Match Highlights : दुखापतग्रस्त असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 91 धावांत सात विकेट्स गेल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने झंझावती द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला तीन विकेस्टने विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेल याने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने द्विशतकी भागिदारी करत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अफागणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचे आव्हान दिले होते. आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने एकाकी लढत आफगाणिस्तानकडून विजय खेचून आणला.

91 धावांत ऑस्ट्रेलियाचे सात आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामध्ये डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श यांच्यासह इतर फलंदाजांचा समावेश होता. आता अफगाणिस्तान संघ एकतर्फी सामना जिंकणार असेच वाटले होते. पण ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी झुंजार खेळी केली. मॅक्सवेलला धावताही येत नव्हते. पण त्याने जिद्द सोडली नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॅक्सवेल अडचणीच्या काळात ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरला आणि आपले द्विशतक पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज अफगाण अक्रमणासमोर नांगी टाकली, पण ग्लेन मॅक्सवेल याने एकट्याने लढा दिला.  दुखापत झाली असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने मैदान सोडले नाही. मॅक्सवेलला धावताही येत नव्हते. पण त्याने जिद्द सोडली नाही, त्याने लढा दिला. डेविड वॉर्नर 18, टेव्हिस हेड 0, मिचेल मार्श 24, मार्नस लाबुशेन 14, जोश इंग्लिंश 0, मार्कस स्टॉयनिस 6 आणि मिचेल स्टार्क 3 धावांवर बाद झाले. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियने 91 धावांत सात फलंदाज गमावले होते. आघाडीच्या सात पलंदाजांना झटपट बाद केल्यानंतर सामन्यावर अफगाणिस्तानचे वर्चस्व होते. पण मॅक्सवेलने एकट्याने लढा दिला. त्याला धावता येत नव्हते, पण त्याने एकट्यानेच किल्ला लढवला. मॅक्सवेलच्या एकट्याच्या जिवावार ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

मॅक्सवेलचे वादळी द्विशतक - 

ग्लेन मॅक्सवेल याने षटकार मारत द्विशतक ठोकले. त्याने 128 चेंडूत नाबाद 201 धावा केल्या आहेत.  मॅक्सवेल याने आपल्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकार ठोकले. मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने 170 चेंडूत नाबाद 202 धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान 179 धावांचे आहे. 

अफगाणिस्तानचा 291 धावांचा डोंगर -

अफगाणिस्ताननं विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९२ धावांचं आव्हान दिलं . विशेष म्हणजे सलामीचा इब्राहिम झादरान हा विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्यानं वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली. इब्राहिम झादराननं १४३ चेंडूंत नाबाद १२९ धावांची खेळी उभारली. याआधी समिउल्ला शिनवारीनं २०१५ सालच्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध केलेली ९६ धावांची खेळी हा अफगाणिस्तानचा आजवरचा वैयक्तिक उच्चांक होता. तो विक्रम झादराननं मोडीत काढला. त्यानं एक खिंड नेटानं लढवून अफगाणिस्तानच्या प्रत्येक फलंदाजासोबत छोटी-मोठी भागीदारी रचली. त्यामुळंच अफगाणिस्तानला ५० षटकांत पाच बाद २९१ धावांची मजल मारता आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget