NZ vs SL, Test Match : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील (SL vs NZ) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपला, त्यानंतर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ही कसोटी मालिका श्रीलंका आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे श्रीलंका सामना जिंकल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात.
भारतीय संघ जो सध्या अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. यासाठी श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांवर नाव कोरावे लागेल. आतापर्यंत श्रीलंकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या संघाच्या दुसऱ्या डावात अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने 115 धावांची शानदार खेळी करत अडचणीतून बाहेर पडण्याचे काम तर केलेच शिवाय अधिक चांगले लक्ष्य देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय दिनेश चंडिमलने 42 तर धनंजया डी सिल्वाने 47 धावांची शानदार खेळी केली.
टिकनर आणि मॅट हेन्री यांनी गोलंदाजीत आपली ताकद दाखवली
दुसरीकडे न्यूझीलंडकडून (New Zealand vs Sri Lanka) श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात ब्लेअर टिकनर आणि मॅच हेन्री यांनी गोलंदाजीत अनुक्रमे 4 आणि 3 बळी घेतले. त्याचबरोबर कर्णधार टीम साऊदीनेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्या आधी सामन्यात, पहिल्या डावात 373 धावा करून न्यूझीलंडने श्रीलंकन संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येवरून थोडीशी आघाडी घेतली होती. दरम्यान आता दिवसाचा खेळ संपताना न्यूझीलंडची स्थिती 28 वर 1 बाद अशी होती. डेवॉन कॉन्वे हा 5 धावा करुन तंबूत परतला होता. टॉम लॅथम (Tom Latham) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) क्रिजवर आहेत.
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 11 | 3 | 4 | 148 | 68.52 |
2. भारत | 10 | 5 | 2 | 123 | 60.29 |
3.श्रीलंका | 5 | 4 | 1 | 64 | 53.33 |
4. दक्षिण आफ्रीका | 7 | 6 | 1 | 88 | 52.38 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. वेस्ट इंडीज | 4 | 5 | 2 | 54 | 40.91 |
7. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
8. न्यूझीलंड | 2 | 6 | 3 | 36 | 27.27 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
हे देखील वाचा-