India Tour of New Zealand: भारतीय क्रिकेट संघाचं यावर्षीचं शेड्यूल खूप व्यस्त आहे. सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर, भारताचा टी-20 संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला अनेक देशांचा दौरा करायचा आहे. एवढेच नव्हेतर, विश्वचषकानंतर भारत लगेच न्यूझीलंड दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं त्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यात भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचाही समावेश आहे. त्यानुसार, भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 

भारताविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंड फेब्रुवारी 2023 मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर किवी संघाला श्रीलंकेचं यजमानपद भूषवायचं आहे.

न्यूझीलंड- भारत यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारिख
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर 2022
दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर 2022
तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022

 

न्यूझीलंड- भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारिख
पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर 2022 
दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर 2022
तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर 2022

 

टी-20 विश्वचषक 2022 च्या तयारीसाठी न्यूझीलंडनं पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत तिरंगी मालिका आयोजित करण्याचा निर्णयही घेतलाय. बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगी मालिका होणार आहे. ही मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 14 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. 

हे देखील वाचा-