ENG vs IND : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील मैदानात कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. भारताच्या मागील दौऱ्यातील एका उर्वरीत कसोटी सामन्याला 1 जुलै रोजी सुरुवात होणार असून यासाठी इंग्लंडने आपला 15 सदस्यीय संघ नुकताच जाहीर केला आहे. यावेळी बेन स्टोक्सकडेच कर्णधारपद असून जेम्स अँडरसन जो न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे तिसरा सामना खेळला नव्हता तोही संघात परतला आहे.

भारताने या कसोटी सामन्यासाठीचा संघ महिनाभर आधीच जाहीर केला होता. पण नुकतीच भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने त्याला बदली खेळाडू म्हणून मयांक अगरवालला संघासोबत जॉईन केलं आहे. दुसरीकडे इंग्लंडने नुकतच न्यूझीलंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिल्यानंतर भारताविरुद्ध आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेटने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

कसा आहे इंग्लंडचा संघ?

अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, क्रेग ओव्हरटन, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, जॅमी ओव्हरटन, मॅटी पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ: 

मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. रोहित शर्मा (कोरोनाबाधित)

इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

हे देखील वाचा -