Nitish Kumar Reddy visited Tirupati Temple : टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया दौरा काही खास गेला नाही, पण या दौऱ्यावर एका युवा अष्टपैलू खेळाडूने आपल्या शानदार पदार्पणाने सर्वांना प्रभावित केले. तो म्हणजे नितीश कुमार रेड्डी. अॅडलेड कसोटीत पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याने टीम इंडियासाठी त्याच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात 42 धावा केल्या. यानंतर मेलबर्न कसोटीत नितीशने शानदार शतक झळकावून खळबळ उडवून दिली.
नितीश कुमार रेड्डीने त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याचा महान पराक्रम केला. त्याचे शतक अशा वेळी झाले जेव्हा, टीम इंडिया अडचणीत होती. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले आणि संघाला संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या कठीण परिस्थितीत खालच्या फळीत खेळताना शतक झळकावण्यात फार कमी फलंदाजांना यश आले.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात मालिका जिंकू शकली नसली तरी, नितीश रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे स्वप्न साकार होताना सर्वांना दिसले. नितीशच्या वडिलांचे स्वप्न होते की, त्यांचा मुलगा एके दिवशी टीम इंडियासाठी खेळेल, जे अखेर पूर्ण झाले. आता ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे, नितीश भारतात परतला आहे. त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, तो देवाचे दर्शन घेण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला. येथे त्याने गुडघ्यांवर बसून तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढला आणि परमेश्वराचे दर्शन घेतले. नितीश गुडघ्यावर पायऱ्या चढत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंडविरुद्ध मिळाली संधी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसेल. रेड्डीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. बांगलादेशविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत नितीशने पहिल्या सामन्यात नाबाद 16 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 74 धावा केल्या. पण, तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात तो आपले खाते उघडू शकला नाही. आता त्याचा प्रयत्न इंग्लंडविरुद्ध बॅट आणि बॉलने चमत्कार करण्याचा असेल.
हे ही वाचा -