Nitish Kumar Reddy Half Century Celebration Video : मेलबर्नच्या खेळपट्टीवर जिथे रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जडेजासारखे दिग्गज खेळाडू धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले, तिथे 21 वर्षीय युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने 118 चेंडूत 82 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, तर पंत बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डीने संघाचा डाव सांभाळला.
यादरम्यान, नितीशकुमार रेड्डीने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. आणि निवड समितीचा योग्य निर्णय योग्य असलेल्याचे त्याने दाखवून दिले. नितीशने मेलबर्नमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.
नितीश कुमार रेड्डीने ठोकले कारकिर्दीतील पहिले अर्धशतक
खरंतर, नितीश कुमार रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत झळकावले आहे. भारतासाठी पहिल्या डावात खेळताना नितीशने 80 चेंडूंचा सामना करत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. हे त्याचे पहिले कसोटी अर्धशतक होते, जे ऑस्ट्रेलियात आले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीदरम्यान नितीशने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळताना बॅटने 222 धावा केल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डीला मैदानात झाली खांद्याला दुखापत
मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या डावाच्या 74व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डी जखमी झाला. पॅट कमिन्सचा शॉर्ट बॉल त्याच्या खांद्याला लागला. यावेळी तो खुप वेदना होत होत्या. त्याला इतक्या जोरात बॉल लागला की त्याच्या हातातून बॅटही खाली पडली. फिजिओ टीम लगेच मैदानात आली आणि त्यानंतर त्यांनी बॅटिंग सुरूच ठेवली.
नितीश कुमार रेड्डीचे पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
नितीश कुमार रेड्डीने मिचेल स्टार्कच्या 83व्या षटकात 4 धावा देत 50 धावा पूर्ण केल्या. कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर नितीशने मैदानात प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट 'पुष्पा'च्या शैलीत सेलिब्रेशन केले. नितीशने पुष्पा यांच्या 'फ्लावर नहीं फायर है...' ही शैली त्याच्या बॅटने कॉपी केली.
हे ही वाचा -