Australia vs India 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. 26 डिसेंबरपासून सुरू असलेल्या या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर दिसत आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऋषभ पंतने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. तो 28 धावा करून बाद झाला. ज्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
सहसा पंत विचित्र शॉट्स खेळून विरोधी संघाला चकित करतात, पण यावेळी कांगारू संघाने त्याच्यासाठी योग्य तो प्लॅन आखला होता. त्याची विकेट अशा वेळी पडली जेव्हा भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी 85 धावा करायच्या होत्या. या चुकीमुळे पंतला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. यासोबतच भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनीही त्यांच्यासाठी 'इडियट' हा शब्द वापरला होता.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 5 विकेट गमावल्या होत्या आणि तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजासह ऋषभ पंतने पहिल्या अर्ध्या तासात चांगली फलंदाजी केली. दोघेही डाव सांभाळतील असे वाटत होते, पण त्यानंतर ऋषभ खराब शॉट खेळून विरोधी संघाला आपली विकेट भेट दिली. खरंतर, आधी स्कॉट बोलँडच्या चेंडूवर रॅम्प शॉट मारण्यात तो अपयशी ठरला, पण पुढच्याच चेंडूवर त्याने तीच चूक पुन्हा केली आणि नॅथन लियॉनने त्याचा झेल घेतला. अशाप्रकारे पंतने 37 चेंडूत 28 धावांची खेळी केली आणि चालू दौऱ्यात सेट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळू शकला नाही.
मेलबर्न कसोटीत समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले, "मूर्खपणाला एक मर्यादा असते. तिथे दोन क्षेत्ररक्षक उभे आहे, तरीही तुम्हाला तोच शॉट खेळायचा आहे. तुम्ही आधीचा शॉट चुकवला होता आणि आता बघा कोणत्या क्षेत्ररक्षकाने तुमचा झेल घेतला आहे. याला विकेट्स देणे म्हणतात हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही, पण हा एक इडियट शॉट आहे आणि तुम्ही तुमच्या संघाची निराशा केली आहे. नीट समजून घेतले पाहिजे."
हे ही वाचा -