सेंट ल्यूसिया : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमधील शेवटची मॅच सुरु आहे. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. यामध्ये निकोलस पूरनच्या 98 धावा महत्त्वाच्या ठरल्या. निकोलस पूरनला यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पहिलं शतक झळकावण्याची संधी हुकली. आझमतुल्लाह ओमरझाईनं बाऊंड्रीवरुन टाकलेल्या थ्रोमुळं निकोलस पूरन धावबाद झाला अन् त्याचं शतकाचं स्वप्न हुकलं. 


निकोलस पूरन, जे. चार्ल्स, शाई होप आणि रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 5 विकेटवर 218 धावा केल्या. वेस्ट इंडिजनं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. निकोलस पूरन यानं 53 बॉलमध्ये 6 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 98 धावा केल्या. निकोलस पूरन  97 धावांवर खेळत असताना त्यानं अखेरच्या ओव्हरमध्ये दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या आझमतुल्लाह ओमरझाईनं टाकलेला थ्रो थेट स्टम्परवर आदळला.ओमरझाईच्या थ्रोमुळं निकोलस पूरन धावबाद झाला. यामुळं निकोलस पूरनचं शतकाचं स्वप्न हुकलं. तो 98 धावांवर बाद झाला. निकोलस पूरननं 98 धावा केल्या तर जे चार्ल्सनं 43 धावा केल्या. शाई होपनं 25 धावा केल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेलनं 26 धावा केल्या.


ओमरझाईनं दिलेल्या 36 धावा


राशिद खाननं आझमतुल्लाह ओमरझाईला डावाची चौथी ओव्हर दिली होती. या ओव्हरमध्ये निकोलस पूरन फलंदाजी करत होता. आझमतुल्लाह ओमरझाईनं या ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या. निकोलस पूरननं तीन षटकार आणि दोन चौकार मारत 26 धावा काढल्या होत्या. ओमरझाईनं त्या ओव्हरमध्ये नो आणि वाईड बॉल देखील टाकले होते.


अफगानिस्तानची टीम 


रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, गुलबदीन नैब, आझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान (कॅप्टन), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी  


वेस्टइंडिजची टीम 


ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मॅक्कॉय


दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध  वेस्ट इंडिज यांच्यातील मॅचमध्ये कोणीही जिंकलं तरी त्याचा परिणाम सुपर 8 मधील लढतींवर होणार नाही. 


संबंधित बातम्या :


Suryakumar Yadav : सुपर 8 पूर्वी रोहित शर्मासह भारताची चिंता वाढवणारी अपडेट, सूर्यकुमार यादवला दुखापत


Fastest T20 Hundred: 27 चेंडूत झळकावले शतक, 18 षटकार अन् 6 चौकारांचा पाऊस; ख्रिस गेलचा मोडला विक्रम