Fastest T20 Hundred: टी-20 क्रिकेटमध्ये झंझावाती पद्धतीने शतके झळकावली जात आहेत. आत्तापर्यंत, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने 2013 च्या आयपीएलमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना केवळ 30 चेंडूत शतक पूर्ण केले होते. आता भारतीय वंशाचा खेळाडू साहिल चौहानने एस्टोनियाकडून खेळताना अवघ्या 27 चेंडूत शतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. एस्टोनिया सायप्रसच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 6 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. आतापर्यंत मालिकेतील दोन्ही सामने एस्टोनियाने जिंकले आहेत.


ख्रिस गेलचा मोडला विक्रम- 


ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 30 चेंडूत शतक झळकावले आहे. आता 17 जून रोजी एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान सायप्रसने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात एस्टोनियाचे पहिले 2 विकेट अवघ्या 9 धावांत पडल्या. त्यानंतर साहिल चौहान फलंदाजीसाठी मैदानात आला आणि येताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू केला. चौहानने अवघ्या 27 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि संपूर्ण सामन्यात त्याने 41 चेंडूत 144 धावांची तुफानी खेळी केली. 144 धावा करताना साहिल चौहानने 18 गगनचुंबी षटकार आणि 6 चौकार लगावले. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम नामिबियाच्या जेन निकोलच्या नावावर होता. 2024 मध्ये नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने 33 चेंडूत शतक पूर्ण केले होते.


सर्वात वेगवान शतक झळकवणार भारतीय खेळाडू कोण?


टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव ऋषभ पंत आहे. 2018 मध्ये आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत दिल्लीकडून खेळताना पंतने हिमाचल प्रदेशविरुद्ध 32 चेंडूत शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव रोहित शर्मा आहे. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.


संबंधित बातम्या: 


Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...


T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


T20 World Cup 2024: 'गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये...'; माजी खेळाडूने दिला सल्ला