Babar Azam News : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे काही खाजगी चॅट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ बनावट आहेत की ओरिजिनल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या लीक झालेल्या चॅटच्या आधारे बाबरवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबतच त्याचे अफेअर असल्याचे देखील बोलले जात आहे. 


सध्या या आरोपांमध्ये तथ्य नाही कारण लीक झालेल्या चॅट व्हिडीओमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. मात्र, जेव्हापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे, तेव्हापासून बाबर आझम ट्रेंडमध्ये आहे. बाबरबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी तर टीकांचा वर्षावच बाबरवर करत आहेत. काहीजण बाबरच्या बाजूने पोस्ट करत असले तरी अनेक नेटकऱ्यांनी बाबरला चांगलच धारेवर धरलं आहे. त्याच्याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून यातील काही प्रतिक्रिया पाहूया...


































खराब फॉर्मनंतर बाबर आणखी अडचणीत


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यातच पाकिस्तानच्या संघाची कामगिरीही अतिशय खराब झाली. मायदेशात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव झाला होता. यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पाकिस्तानमधील क्रीडा चाहते बाबर टीका करत होते. काही चाहत्यांनी बाबरला सपोर्ट केला आहे. तर काही माजी क्रिकेटपटूंनी बाबरला कर्णधारपदावरुन काढायला हवं, त्याच्या खेळात सुधारणा होईल, असे मतही व्यक्त केलेय. त्यामुळे आधीच अडचणीत असणारा बाबर आता नव्या अडचणीत सापडला आहे.


हे देखील वाचा-