India vs South Africa, T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्याला आता केवळ एक दिवस शिल्लक आहे. 9 जून रोजी हा पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यांसाठी भारताने सराव देखील सुरु केला असून भारतीय संघात आता एक महत्त्वाचा बदल झाला आहे. नवा फिजीओ कमलेश जैनच्या (Kamlesh Jain) रुपात भारतीय संघासोबत सामिल झाला आहे.

जैन हा भारताचे सध्याचे फिजीओ नितीन पटेल (Nitin Patel) याची जागा घेणार आहे. दरम्यान कमलेश जैन मागील 10 वर्षांपासून केकेआर संघाचा फिजीओ म्हणून काम पाहत होता. आता त्याची वर्णी थेट भारतीय संघात झाली असून नितीन पटेल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणार आहे.

भारताचं पारडं जड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 9 जून अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.