Natasa Stankovic-Hardik Pandya : नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने नुकतेच घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर नताशा तिच्या 4 वर्षांच्या अगस्त्यासोबत तिच्या मूळ गावी सर्बियाला गेली. पण घटस्फोटाच्या दीड महिन्यानंतर नताशा पुन्हा मुंबईत परतली आहे. आणि नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर मंगळवारी मुलगा अगस्त्य पहिल्यांदाच वडिलांच्या घरी गेला.
घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच अगस्त्यासोबत हार्दिकच्या घरी...
खरंतर, सोमवारी मुंबईत परतलेल्या नताशाने मंगळवारी पांड्याच्या घरी मुलाला सोडले होते. हार्दिकची वहिनी पंखुरी शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अगस्त्यसोबतची झलक शेअर केली आहे. पंखुरी शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अगस्त्य खेळताना दिसत आहे. यासोबत व्हिडिओमध्ये पंखुरीचा मुलगाही दिसत आहे.
नताशा-हार्दिकचा जुलैमध्ये घटस्फोट
हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली होती. मे 2020 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये नताशा आणि हार्दिकने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. मात्र, दोघांनी जुलै 2024 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.
नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाचे कारण का?
नुकतेच टाईम्स नाऊच्या एका रिपोर्टमध्ये नताशा आणि हार्दिकच्या विभक्त होण्याचे कारण समोर आले आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एका जवळच्या सूत्राने सांगितले की, हार्दिक जास्त शो ऑफ करायचा जो नताशाला आवडत नव्हता. माणूस म्हणून तो खूप बदलला आहे. अनेक वर्षांपासून नताशाने स्वत:ला क्रिकेटरशी जुळवण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिकने स्वत:ला बदलले नाही. त्यामुळे शेवटी तिला क्रिकेटरला घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हे ही वाचा -