Virat Kohli not in Playing 11 : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात भारताचा मुख्य फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) संघात नसल्याचं समोर आलं आहे. विराट दुखापतीमुळे सामना खेळणार नसल्याची चर्चा होती, ज्यावर आता शिक्कामोर्कब झालं आहे. विराटच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. 


लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर आज भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पार पडत आहे. दरम्यान यासाठी दोन्ही संघानी आपआपल्या अंतिम 11 मध्ये दिग्गज खेळाडूंना संधी दिली आहे. यावेळी भारतीय संघात मोहम्मद शमी, शिखर धवन या दिग्गजांचं तर इंग्लंड संघात बेन स्टोक्स सारखे दिग्गज परतले आहेत. दोन्ही संघात दिग्गज खेळाडू परतल्याने एक अटीतटीचा सामना आज पाहायला मिळू शकतो. तर या महत्त्वाच्या सामन्यासाठी नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया... 


भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी 


इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, आर. टोप्ले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स


भारताने जिंकली टी20 मालिका


आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होत असून याआधी टी20 मालिका भारताने जिंकली आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या टी20 मालिकेत पहिल्या सामन्यापासून भारताने आक्रमक आणि दमदार खेळ दाखवला. यावेळी पहिला सामना तब्बल 50 धावांनी भारताने जिंकत आधी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सामना 49 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. पण अखेरच्या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ शकला नाही. पण मालिका भारताने जिंकली.


हे देखील वाचा-