ENG vs IND: भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यात आजपासून तीन दिवसांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतानं टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. परंतु, एकदिवसीय मालिकेसाठी जो रूट (Joe Root), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या प्रमुख त्रिकुटाचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळं टी-20 मालिकेच्या तुलनेत एकदिवसीय मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकेल.
एजबॅस्टन कसोटीत गाजवलंय मैदान
टी-20 मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं सात विकेट्नस विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली. इंग्लंडच्या विजयात जॉनी बेअरस्टो, जो रूटनं मोलाचा वाटा उचलला. तसेच कर्णधार बेन स्टोक्सचं उत्कृष्ट नेतृत्व पाहायला मिळालं. या कसोटीच्या पहिल्या तीन दिवस बॅकफूटवर असतानाही इंग्लंडच्या संघानं पुनरागमन करत सामना जिंकलाय. इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोनं 140 चेंडूत 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं नाबाद 114 धावांची खेळी केली. याशिवाय, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं आक्रमक फलंदाजी करत 173 चेंडूत 142 धावा केल्या.
भारत- इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै 2022 | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै 2022 | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै 2022 | मँचेस्टर |
एकदिवसीय मालिकेवर सर्वांची नजर
इग्लंडविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या टी-20 मालिकेत जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि बेन स्टोक्स संघाचा भाग नव्हते. परंतु, एकदिवसीय मालिकेत या तिघांचंही पुनरागमन होणार आहे. कसोटी सामन्यात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासमोर भारताची गोलंदाजी फिकी दिसली. यामुळं एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 1st ODI, Playing 11 : रोहित-गब्बर जोडी मैदानात उतरणार, कशी असेल भारताची अंतिम 11?
- Virat Kohli Injury : विराट कोहलीच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार?
- ICC WTC Points Table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजयानंतर श्रीलंकेला WTC गुणतालिकेत मोठा फायदा, थेट तिसऱ्या स्थानावर झेप