Mushfiqur Rahim Helmet Celebration: तुम्हाला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील टी20 सीरिजमधील (T20 Series) टाईम आऊटचा वाद आठवतोय का? श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) टाईम आऊट (Time Out) झाला होता. यासोबतच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) टाईम आउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला होता. आता हाच वाद पुन्हा नव्यानं समोर आला आहे. बरं सामनाही त्याच दोन संघांमधील श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील.
क्रिकेटमध्ये टाईम आऊटचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे. खरं तर, श्रीलंकेनं घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत बांगलादेशला 2-1 नं पराभूत केलं. यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी टाईम आऊट साजरा करत बांगलादेशी संघाची छेड काढली. पण श्रीलंकेच्या खेळाडूंना बांगलादेशनं सडेतोड उत्तर दिलं. 3 सामन्यांच्या होम वनडे मालिकेत श्रीलंकेला 2-1 नं पराभूत करून स्कोअर सेट केला.
बांगलादेशकडून "इट का जबाब पथ्थर से"
बांगलादेशनं टी20 सीरिज खिशात घालत श्रीलंकेला सडेतोड उत्तर दिलंच. पण श्रीलंकेला त्यांच्या टाईम आऊटचीही आठवण करुन देत जखमेवर मीठ चोळलं. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशी खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करत होते. यावेळी बांगलादेश संघाला ट्रॉफी देण्यात आली, त्यानंतर मुशफिकुर रहीमनं तुटलेलं हेल्मेट आणून आपल्या सहकारी खेळाडूंना दाखवण्यास सुरुवात केली. यानंतर सर्व खेळाडू हसू लागले.
बांगलादेश संघाचं हे हेल्मेट सेलिब्रेशन चांगलंच व्हायरल होत आहे. कारण ज्या सीरिजवेळी टाईम आऊटता वाद झाला होता, त्या सीरिजमध्ये श्रीलंकेच्या संघानं टी-20 मालिका जिंकल्यानंतर हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवत पोझ दिली होती. त्यामुळे त्यालाच प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशच्या खेळाडूंनी तुटलेलं हेल्मेट दाखवत सेलिब्रेशन केल्याचं बोललं जात आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील टाईम आऊट कॉन्ट्रोव्हर्सी नेमकी काय?
गेल्या वर्षी भारताच्या यजमानपदावर एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला होता. 6 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये हा 'टाईम आऊट वाद' समोर आला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या डावात अँजेलो मॅथ्यूजला 25व्या षटकात टाईम आऊट देण्यात आला. 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाची वेळ संपली आणि त्याला टाईम आऊट घोषित करण्यात आलं. हे 25 वं षटक शकीबनं टाकलं होतं, ज्याच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाला. यानंतर मॅथ्यूज मैदानात आला, पण खेळपट्टीवर पोहोचताच त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर मॅथ्यूजनं लगेच ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवून दुसरं हेल्मेट मागितलं, पण नजमुल हुसैन शांतोच्या विनंतीवरून गोलंदाज शाकिब अल हसननं अपील केलं, त्यावर मैदानावरील पंचांनी मॅथ्यूजला टाईम आऊट म्हटलं. अशाप्रकारे षटकाचा पुढचा चेंडू टाकण्यापूर्वीच मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला. त्यानंतर हे दोन्ही संघ जेव्हा-जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा 'टाईम आऊट कॉन्ट्रोव्हर्सी'चे पडसाद नेहमीच पाहायला मिळतात.
'त्या' सामन्यात नेमकं काय घडलेलं?
श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झालेला पहिला फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तो एकही चेंडू न खेळता बाद झाला. आयसीसीच्या नियमानुसार, नव्या फलंदाजानं दोन मिनिटांच्या निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी सज्ज होणं अपेक्षित आहे. पण फलंदाजीचा पवित्रा घेण्याआधी मॅथ्यूजला आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यानं राखीव खेळाडूकडून दुसरं हेल्मेट मागवलं. त्यात काही वेळ गेल्यानं बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि इतर क्षेत्ररक्षकांनी मॅथ्यूजविरोधात टाईमआऊटचं अपील केलं. मैदानावरच्या पंचांनी तो निर्णय तिसरे पंच नितीन मेनन यांच्यावर सोपवला. त्यांनी डीआरएसचा वापर करून मॅथ्यूजविरोधातलं टाईमआऊटचं अपील उचलून धरलं. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजनं मैदानावरील पंचांशी काही काळ वाद घातला. पण बांगलादेशचा कर्णधार आपल्या अपिलावर ठाम राहिला. त्यामुळं तिसऱ्या पंचांचा निर्णय स्वीकारून अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.