एक्स्प्लोर

Mumbai Indians Playoffs Scenario IPL 2026 : पाचवेळा चॅम्पियन, पण आता मिशन इम्पॉसिबल...; प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोर एकच अट, जाणून घ्या समीकरण

Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 मध्ये परिस्थिती सध्या काहीशी चिंताजनक दिसत आहे.

Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 मध्ये परिस्थिती सध्या काहीशी चिंताजनक दिसत आहे. पाच वेळा किताब जिंकलेल्या या संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात दमदार विजयाने केली होती. वानखेडे मैदानावर पहिल्या सामन्यातील पराभवाची परंपराही त्यांनी मोडली होती. मात्र त्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली आणि सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले. आता या स्थितीत संघासमोर पुढची वाट खडतर दिसत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला जोरदार पुनरागमन करणे अत्यावश्यक आहे.

पण, या संघाचा इतिहास पाहिला तर अशा कठीण परिस्थितीतूनही त्यांनी जबरदस्त कमबॅक केले आहे. याआधीही खराब स्थितीतून उभारी घेत त्यांनी किताब पटकावला आहे. त्यामुळे यंदाही चाहत्यांना तसाच चमत्कार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या प्लेऑफ समीकरणाचा विचार केला, तर मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळले असून प्रत्येक संघाला लीग टप्प्यात 14 सामने खेळायचे आहेत. म्हणजेच मुंबईकडे अजून 9 सामने शिल्लक आहेत आणि याच सामन्यांमध्ये त्यांना विजयाची मालिका सुरू करावी लागणार आहे.

मुंबई अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकते? (Mumbai Indians Playoffs Qualification Scenario IPL 2026)

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाल्यास, पाच सामन्यांनंतर संघाकडे सध्या फक्त 2 गुण आहेत. ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. सलग चार पराभवांनंतर, संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता अधिकच कठीण झाल्या आहेत. गेल्या काही हंगामांमध्ये, प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरिता 16 गुणांचा जादुई आकडा राहिला आहे. त्यामुळे, जर मुंबईला 16 गुणांपर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यांना त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी किमान 7 सामने जिंकावे लागतील.

याचा अर्थ असा की, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पहिली आवश्यक अट म्हणजे त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून 16 गुणांपर्यंत पोहोचणे. दरम्यान, जर पावसामुळे एखादा सामना रद्द झाला, तर संघाच्या मार्गात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे, जर मुंबईने 9 पैकी किमान 8 सामने जिंकण्याचे ध्येय ठेवले, तर ते सुरक्षित मानले जाऊ शकते. त्यामुळे, संघाचा मार्ग कठीण वाटतो.

मुंबईची अलीकडील कामगिरी पाहता, त्यांच्या उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 किंवा 7 सामने जिंकणे कठीण वाटते. या संघात स्टार खेळाडूंची कमतरता नाही. रोहित शर्मा जखमी आहे, पण त्याचा बदली खेळाडू क्विंटन डी कॉकनेही शतक झळकावले आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट निष्प्रभ ठरले आहेत. सूर्या आणि तिलकही आपली कामगिरी बजावण्यात अपयशी ठरले आहेत. याचा अर्थ असा की, जर या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर अपयशी ठरलेल्या खेळाडूंनाच हिरो बनावे लागेल.
 
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या 5 सामन्यांचे निकाल (Mumbai Indians IPL 2026)

केकेआर विरुद्ध : 6 गडी राखून विजय
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध : 6 गडी राखून पराभव
राजस्थान रॉयल्स विरुद्ध : 27 धावांनी पराभव
आरसीबी विरुद्ध : 18 धावांनी पराभव
पंजाब किंग्स विरुद्ध : 7 गडी राखून पराभव

मुंबई इंडियन्सच्या उर्वरित 9 सामन्यांचे वेळापत्रक

सामना 30 : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 20 एप्रिल (अहमदाबाद)
सामना 33 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 23 एप्रिल (मुंबई)
सामना 41 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 29 एप्रिल (मुंबई)
सामना 44 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2 मे (चेन्नई)
सामना 47 : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 4 मे (मुंबई)
सामना 54 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, 10 मे (रायपूर)
सामना 58 : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 14 मे (धर्मशाला)
सामना 65 : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 20 मे (कोलकाता)
सामना 69 : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 24 मे (मुंबई)

हे ही वाचा -

MI vs PBKS Preity Zinta : मुंबईविरुद्ध सामना जिंकताच प्रिती झिंटाने एका फोटोमधून न बोलता सगळं सांगितलं; पंजाबच्या मालकीनची पोस्ट व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-5 Live : पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget