(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MSD Twitter Verification: महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर खात्यावरून ब्लू टिक हटवली
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर खात्यावरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यापाठीमागेच कारण अद्याप ट्विटरने स्पष्ट केलेले नाही.
Twitter Blue Tick: भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णाधार महेंद्र सिंह धोनी संदर्भात मोठी बातमी आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ब्लू टिक काढून घेतली आहे. महेंद्र सिंह धोनीचे ट्विटर अकाऊंट सक्रीय नसल्याने ब्लू टिक काढली असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही ट्विटरने अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेतली आहे. दरम्यान, काही काळानंतर निळी टिक पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे.
काय कारण असू शकते?
गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक ट्विटरने काढून घेतली होती. महेंद्र सिंह धोनीचं ट्विटर अकाऊंटही सध्या सक्रीय असल्याचे दिसत नाही. धोनीच्या अकाऊंटवर 8 जानेवारी 2021 ला शेवटचं ट्विट पहायला मिळत आहे. या ट्विटमध्ये धोनी स्टोबेरीच्या शेतात दिसत असून तो स्टोबेरी खात असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला असून त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. दरम्यान, सर्वाधिक फोलोवर्स असलेल्यांमध्ये धोनीचं ट्विटर हँडल मोडते. धोनीच्या ट्विटरवर सध्या 8.2 मिलीयन फोलोवर्स असून तो फक्त 33 लोकांना फोलो करत आहे. धोनीने खूप महिन्यांपासून कोणतही ट्विट केलं नाही. शिवाय यावर तो सक्रीय देखील दिसत नाही. त्यामुळे ब्लू टिक काढल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीही ट्विटर अनेकांचे ब्लू टिक काढलेत
मागच्याच महिन्यात ट्विटरने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर खात्यावरून निळी टिक काढून टाकण्यात आली. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. ट्विटरने म्हटले आहे की मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील त्यांच्या हँडलचे नाव बदलणे हे निळ्या टिक काढून टाकण्यामागचे कारण असू शकते.
ट्विटरवर नेत्याची निळी टिक काढून टाकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यातून निळी टिक काढून टाकली होती. नंतर त्याच्या खात्यावर निळी टिक परत आली. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून निळ्या रंगाची टिक काढून टाकण्यात आली होती पण नंतर ती पूर्ववतही करण्यात आली.