MS Dhoni May be Treated as Uncapped Player IPL 2025 : आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी कोण कोणत्या खेळाडूंना फ्रँचायझी संघ कायम ठेवणार यावर सतत चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने नुकतीच लीगच्या फ्रँचायझी मालकांची बैठक घेतली होती. यावेळी मेगा ऑक्शन, इम्पॅक्ट प्लेअर आणि रिटेन्शन पॉलिसीबाबत चर्चा झाली. चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयकडे बैठकीत एक नियम आणण्याची मागणी केली होती, जेणेकरून ते धोनीला येत्या हंगामातही कायम ठेवू शकतील.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सीएसकेची मागणी मान्य केली आहे. धोनीला आयपीएल 2025 मध्ये खेळवण्यासाठी बोर्ड मोठे पाऊल उचलू शकते. जर बोर्डाने असे केले तर मेगा लिलावापूर्वी सीएसकेला एक मोठी आनंदाची बातमी मिळेल.


काय आहे नियम?


आयपीएलच्या पहिल्या सत्रात एक नियम आणण्यात आला होता. या अंतर्गत, कोणतीही फ्रेंचायझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत कमी पैशात खरेदी करू शकते. त्यासाठी अट एवढीच होती की त्यांच्या निवृत्तीला 5 वर्षे झालं असावते. हा नियम 2021 मध्ये बीसीसीआयने काढून टाकला कारण तो कधीही वापरला गेला नाही. 


पण न्यूज 18 च्या वृत्तानुसार, 31 जुलै रोजी झालेल्या बैठकीत चेन्नईने धोनीला खेळवण्यासाठी हा नियम परत आणण्याची मागणी केली होती. खूप कमी फ्रँचायझींनी सीएसकेचे समर्थन केले. आता सूत्रांच्या हवाल्याने हा नियम परत येईल अशी अपेक्षा आहे. बोर्ड याची घोषणा करू शकते.


एमएस धोनी आयपीएल 2025 खेळणार का?


धोनीने नुकतेच आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच्या हातात काहीच नाही, नवीन रिटेन्शन नियमांवर सर्व काही अवलंबून असेल, असे तो म्हणाला होता. सध्या मेगा लिलावापूर्वी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम आहे. पण ताज्या अहवालानुसार अनकॅप्ड कॅटेगरी आणि रिटेन्शनच्या नियमांमध्ये बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 


 


संबंधित बातमी :


Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा


पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार भांडण, प्रिती झिंटा कोर्टात पोहोचली; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


Ishan Kishan : 6,6,6,6,6,6.... इशान किशनने पाडला षटकारांचा पाऊस! ठोकलं धमाकेदार शतक; बांगलादेशविरुद्ध गंभीर देणार संधी?