Ishan Kishan Century : भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला इशान किशन पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळत नसली तरी बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाकडून खेळताना त्याने शानदार शतक झळकावून पुनरागमनाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. इशानचे शतक आणखी खास बनले कारण त्याच्या संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही.


सध्या बुची बाबू स्पर्धा खेळली जात आहे. झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश संघाने 225 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून शुभम कुशवाहाने सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. तर अरहम अकीलने 57 धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.


यानंतर झारखंडकडून इशान किशनशिवाय अन्य कोणताही फलंदाज चांगला कामगिरी करू शकला नाही. इशान किशनने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी सुरू ठेवत अवघ्या 86 चेंडूत शतक झळकावले. इशानने आपले शतक पूर्ण केले तोपर्यंत संघाने 225 हून अधिक धावा केल्या होत्या. म्हणजे आता इथून संघाच्या धावसंख्येचे रूपांतर आघाडीत होईल. इशान किशनने दोन बॅक टू बॅक सिक्स मारत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 107 चेंडूंचा सामना करत 114 धावांची खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 10 षटकार आले, तर त्याचा स्ट्राइक रेट 107 च्या आसपास होता.






टीम इंडियासाठी ठोकला दावा


टीम इंडिया सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. इशानसह अनेक खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. अशा परिस्थितीत इशानची फलंदाजी निवडकर्त्यांना नक्कीच आवडेल. इशानने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तर त्याचा शेवटचा कसोटी सामना जुलै 2024 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होता. इशान बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.


 



ही पण वाचा -



PKL Auction: ऐतिहासिक! प्रो कबड्डीने बनवला सर्वाधिक करोडपती बनवण्याचा रेकॉर्ड, 8 जण झाले कोट्यधीश


Vinesh Phogat Coach : 'मला वाटलं ती मरेल...', त्या रात्री विनेश फोगाट सोबत काय झालं? कोचने केला धक्कादायक खुलासा