MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) शेअर करत चेन्नईच्या चाहत्यांनी उत्सुकता वाढवली आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगामात नव्या भूमिकेत येणार असल्याचे संकेत महेंद्रसिंग धोनीने दिले आहेत. धोनीची पोस्ट चेन्नईच्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाली आहे. दरम्यान, 2024 मध्ये धोनी कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कदाचित हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. 


धोनीने (MS Dhoni) फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, नव्या हंगामासाठी आणि नव्या भूमिकेसाठी वाट पाहू शकत नाही. या पोस्टमधून धोनीने स्पष्ट केले आहे की, तो आगामी आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या नव्या भूमिकेबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 



धोनीच्या नेतृत्वात चेन्नई पाच वेळेस बनली चॅम्पियन 


45 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएलमध्ये तो सातत्याने खेळत आला आहे. दरवर्षी त्याचा हा शेवटचा हंगाम असेल, असे म्हटले जाते. मात्र, धोनी त्याच ताकदीने मैदानात उतरतो. फिटनेस दाखवतो आणि संपूर्ण हंगाम खेळून काढतो. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात तब्बल 5 वेळेस चॅम्पियन बनला आहे. धोनीच्या नेतृत्वातच चेन्नईने 2023 च्या हंगामात दिमाखदार कामगिरी केली होती. चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. 


महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अंनत अंबानीच्या विवाहापूर्वीच्या सोहळ्यांना हजेरी लावली होती. तो पत्नी साक्षीसमवेत जामनगरमध्ये दाखल झाला होता. चेन्नईचा संघ या वर्षीचा पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी मैदानात जोरदार तयारी सुरु केली आहे. 


धोनी राजकारणात एन्ट्री करणार का?


महेंद्रसिंग धोनीच्या फेसबुक पोस्टचे अनेकजण वेगवेगळे अर्थ काढताना दिसत आहेत. काही जणांनी त्याच्या पोस्टचे राजकीय अर्थ काढले आहेत. कारण धोनी नव्या हंगामात नव्या भूमिकेत येणार असे म्हटले. मात्र, कोणत्या क्षेत्रात याबाबतचा उल्लेख पोस्टमध्ये केलेला नाही. त्यामुळे धोनी राजकारणात एन्ट्री करणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Video : लहानपणीच्या आठवणींमध्ये रमला ऋषभ पंत, लहान मुलांसोबत लुटला गोट्या खेळण्याचा आनंद