IPL 2023: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) शनिवारी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली होती. ज्यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. परंतु, आज धोनीनं लाईव्हला येऊन अशा चर्चांना पूर्णविराम लावलाय. महत्वाचं म्हणजे, बिस्किट कंपनी ओरियाच्या (OREO Cookies) भारतातल्या पहिल्या लॉन्चसाठी धोनी लाईव्ह आला होता. त्यानं आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. 


दरम्यान, सध्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत असलेल्या महेंद्रसिंग धोनी वैयक्तिक आयुष्य जगण्यावर जास्त भरत देतो. तो कधीच जास्त प्रकाशझोतात राहत नाही. तसेच तो सोशल मीडियापासूनही स्वत:ला दूर ठेवतो. दरम्यान, धोनीनं रविवारी (25 सप्टेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर लाइव्ह येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनी आता आयपीएललाही अलविदा करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याचबरोबर फेसबूक लाईव्हद्वारे धोनी नेमकं कशाची घोषणा करतोय? असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला.धोनीनं शनिवारी केलेल्या पोस्टनुसार रविवारी फेसबूकवर लाईव्ह आला. धोनी लाइव्ह आला, तेव्हा लाखो लोक त्याला लाईव्ह पाहत होते, यावरून त्याच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लागतो. महत्वाचं म्हणजे, बिस्किट कंपनी ओरियाच्या भारतातल्या पहिल्या लॉन्चसाठी धोनी लाईव्हला आला होता. याआधी धोनी आणि त्याची मुलगी जीवा यांनीही या कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत.


आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.


महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि  98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.  त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-