Sourav Ganguly Statement : भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचं नाव घेतलं जातं. त्याने भारताला विश्वचषक जिंकवून दिला नसला तरी भारतीय क्रिकेटची दिशा बदलण्यात त्याची मोलाची कामगिरी आहे. सध्या बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सौरवने भारताचे मागील काही वर्षातील कर्णधार धोनी आणि कोहली तसंच सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नेतृत्त्वाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


'महेन्द्र सिंह धोनीचं शानदार नेतृत्व'


सौरव गांगुलीने महेन्द्र सिंह धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना धोनीने भारतीय क्रिकेटचं शानदार नेतृत्व केलं अशी खास प्रतिक्रिया दिली आहे. धोनीने 2007 टी20 वर्ल्ड कप तसंच 28 वर्षानंतर 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप भारताला जिंकवून दिला, असं बोलत गांगुलीने धोनीचं कौतुक केलं असून त्याने विराटबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या नेतृत्त्वात भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अगदी अप्रतिम कामगिरी केली असून आता रोहित शर्माची वेळ आली आहे, असंही गांगुली म्हणाला. 


'रोहित शर्माचं लक्ष आयसीसी स्पर्धांवर'


सध्या रोहित शर्मा तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमध्ये भारताचा कर्णधार (Indian Captain) आहे. याबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला, ''जवळपास मागील 10 वर्षांत भारतीय टीम एकही आयसीसी टूर्नांमेंट जिंकलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा आता कर्णधार झाल्यानंतर त्याचं लक्ष आयसीसी स्पर्धांवर असेल.'' रोहित आता आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतऱणार आहे. सध्या भारतीय संघाकडे आशिया कपचं विजेतेपद असल्यानं आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी संघ मैदानात उतरेल. विशेष म्हणजे शर्मानेच हे टायटल जिंकवून दिल्याने तो पुन्हा एकदा विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितने आतापर्यंत भारताचं कर्णधारपद स्विकारल्यानंतर अप्रतिम कामगिरी कायम ठेवली आहे. त्याने सर्वच्या सर्व मालिका आतापर्यंत पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर जिंकल्या असून तो ही विजयी घोडदौड कायम ठेवेण्यासाठी सर्व प्रयत्न नक्कीच करेल. 


हे देखील वाचा-