IND vs SL 3rd ODI, Toss Update: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा तिसरा सामना (IND vs SL) काही वेळातच सुरु होत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीच्या वन-डे सामन्यातही भारताने आधी फलंदाजी करत एक विशाल धावसंख्या उभारली होती. आजही तशी मोठी धावसंख्या करुन श्रीलंका संघावर प्रेशर आणण्याचा डाव भारताचा आहे.दरम्यान आजच्या सामन्यात उमरान मलिक आणि हार्दिक पांड्या या दोघांना विश्रांती देऊन सूर्यकुमार यादव आणि  वॉशिंग्टन सुदंर यांना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका संघानेही दोन बदल संघात केले आहेत.


भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 94 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे.  






श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेईंग 11-


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी


भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी श्रीलंकेची प्लेईंग 11-


अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अशेन बंडारा, चारिथ असालंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वांडर्से, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, लाहिरू कुमारा


हे देखील वाचा-