एक्स्प्लोर

बुमराह तिसऱ्या क्रमांकावर, यंदाच्या विश्वचषकात विकेट घेणारे टॉप 10 गोलंदाज कोणते ?

World Cup 2023 : जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर, मधुशंका यांच्याशिवाय रबाडा यांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 

Most Wickets in ICC Cricket World Cup 2023 : भारतात सुरु असलेल्या विश्वचषक मध्यवर आला आहे. आतापर्यंत या विश्वचषकात फलंदाजाचे वर्चस्व पाहायला मिळाले. या विश्वचषकात अनेक विक्रम झाले आणि तुटलेही...फलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या विश्वचषकात गोलंदाजांनीही आपला करिष्मा दाखवलाय.  जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर, मधुशंका यांच्याशिवाय रबाडा यांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 

न्यूझीलंडचा मिचेल सँटनर आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पण खऱ्या अर्थाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केलाय. त्यांच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत. आघाडीच्या 10 गोलंदाजांमध्ये तीन गोलंदाज एकट्या दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्याशिवाय न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी दोन दोन गोलंदाजांचा समावेश आहे. भारताचा जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज टॉप 10 गोलंदाजांमध्ये आहे. 

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर 12 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा दिलशान मधुशंका 11 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा जसप्रीत बुमराहही 11 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाहूयात टॉप 10 गोलंदाजामध्ये कोण कोण आहे..

2023 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 10 गोलंदाज  - 

1. मिचेल सँटनर (न्यूझीलंड) - 12 विकेट

2.दिलशान मधुशंका (श्रीलंका )- 11 विकेट

3. जसप्रीत बुमराह (टीम इंडिया) - 11 विकेट

4. मॅट हेनरी (न्यूझीलंड) - 10 विकेट

5. शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 10 विकेट

6. मार्को यानसन (दक्षिण आफ्रिका)- 10 विकेट

7. कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- 10 विकेट 

8. Gerald Coetzee (दक्षिण आफ्रिका) - 10 विकेट

9. अॅडम झम्पा (ऑस्ट्रे्लिया)-9 विकेट

10. हसन अली (पाकिस्तान) -8 विकेट

11. हॅरिस रौफ (पाकिस्तान)- 8 विकेट

12. कुलदीप यादव (भारत) - 8 विकेट

फलंदाजीत डिकॉक आघाडीवर, विराट दुसऱ्या स्थानावर -

यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक वेळा दक्षिण आफ्रिकेने 300 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आफ्रिकेने एकवेळा 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. एकवेळा 399, 382 धावांचा डोंगर उभारलाय. मंगळवारी बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेताना आफ्रिकेने 382 धावा चोपल्या होत्या. या सामन्यात क्विंटन डिकॉक याने 174 धावांची शानदार खेळी केली होती. डिकॉक यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. 

बांगलादेशविरोधात 174 धावांची खेळी करत क्विंटन डिकॉकने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकले. क्विंटन डिकॉकने 81.40 च्या सरासरीने 407 धावांचा डोंगर उभारलाय. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 39 चौकार आणि 15 षटकार निघाले आहेत. विराट कोहलीने 118 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकाचे तीन आणि भारताच्या दोन फलंदाजांचा समावेश आहेत. 

2023 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा 10 फलंदाज - 

1- क्विंटन डिकॉक (दक्षिण अफ्रीका)- 407 रन

2- विराट कोहली (भारत)- 354 रन

3- रोहित शर्मा (भारत)- 311 रन

4- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- 302 रन

5 - डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 301

6- रचिन रविंद्र (न्यूझीलंड)- 290 रन

7- हेनरिक क्लासेन (दक्षिण अफ्रीका)- 288 रन

8- डेरिल मिचेल (न्यूझीलंड) -268

9- एडेन मार्करम (दक्षिण अफ्रीका)- 265 रन

10- अब्दुल्ला शफीक (पाकिस्तान)- 255 रन

11- डेवोन कॉनवे (न्यूझीलंड)- 249 रन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Embed widget