Rohit Sharma In World Cup : भारतीय कर्णधार रोहित शर्मा यंदा भन्नट फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात रोहित शर्मा नव्या विक्रमाला गवसणी घालत आहे. कधी सचिन तेंडुलकरचा तर कधी धोनीचा विक्रम रोहित शर्माने मोडला आहे. धरमशालाच्या मैदानात रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सचा षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे.
हिटमॅनच्या नावावर मोठा रेकॉर्ड -
न्यूझीलंडविरोधात रोहित शर्माने नवा विक्रम नावावर केला आहे. रोहित शर्माच्या नावावर विश्वचषकातील षटकारांचा विक्रम झाला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहित शर्माच्या पुढे युनिवर्स बॉस ख्रिस गेल आहे.
डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडला -
धरमशालाच्या मैदानात रोहित शर्माने एबी डिव्हिलिअर्स याचा विक्रम मोडला आहे. एबीचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला चार षटकारांची गरज होती. आज रोहित शर्माने चार षटकार मारत हा विक्रम नावावर केला आहे. विश्वचषकात डिव्हिलिअर्सने आतापर्यंत 37 षटकार ठोकलेत. रोहित शर्माने हा विक्रम मोडला आहे. रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज झाला आहे.रोहित शर्माच्या नावावर 40 षटकारांची नोंद झाली आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेल सध्या पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ख्रिस गेलच्या नावावर 49 षटकारांची नोंद आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे, सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला आहे. आता षटकारांचा विक्रम रोहितच्या निशाण्यावर आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज -
1. ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) - 49 षटकार
2. रोहित शर्मा (भारत) - 40 षटकार
3. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण अफ्रीका) - 37 षटकार
4. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 31 षटकार
5. ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) - 29 षटकार
दरम्यान, रोहित शर्माने यंदा आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडला आहे. पहिल्या चेंडूपासूनच रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करतो. रोहित शर्मा याने यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 षटकार मारले आहेत. एका वर्षात 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला आशियाचा खेळाडू ठरलाय.
रोहित शर्माची छोटेखानी खेळी -
274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 11 षटकात 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही माघारी परतला. शुभमन गिल याने 31 चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. भारताला 80 धावांत दोन धक्के बसले आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर आहेत.