IND Vs NZ, World Cup 2023 : विश्वचषकाला सुरुवात झाल्यानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय भारताच्या फिल्डिंगचेही कौतुक होत होते. पण न्यूझीलंडविरोधात भारताकडून अतिशय खराब फिल्डिंग झाली. अर्धशतकी फलंदाजी करणाऱ्या रचित रवींद्र याला दोन वेळा जीवनदान मिळाले. तर डॅरेल मिचेल याचाही एक झेल सोडला गेला. जसप्रीत बुमराहने अतिशय सोपा झेल सोडल्यानंतर विराट कोहलीसह स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या चेहऱ्याचाही रंग उडाला. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत भारताची फिल्डिंग सर्वात चांगली होती. भारताच्या फिल्डिंगची अॅक्युरेसी  91 टक्के होती. एकेरी दुहेरी धावसंख्याही घेणं कठीण होते, पण आजच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी निराश केले. 


रविंद्र जाडेजाला फिल्डिंगसाठी ओळखलं जाते. मागील सामन्यात त्याने अप्रतिम झेल घेतला होता. पण न्यूझीलंडविरोधात त्याने अतिशय सोपा झेल सोडला. रचित रविंद्र याने भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली. केएल राहुल याच्याकडूनही रचित रविंद्र याला जीवनदान मिळाले. गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत फिल्डिंगमुळेही सामना जिंकता येतो, हे अनेकदा सिद्ध झालेय, पण आज भारताने अतिशय खराब फिल्डिंग केली, त्याचाच फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. अवघ्या 19 धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज माघीर परतले होते, त्यानंर रचित रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला. झेल सोडत त्यांना भारताच्या खेळाडूंनी मदत केली. 


डॅरेल मिचेल याने कुलदीप यादव याला मोठा फटका मारला. हा चेंडू जसप्रीत बुमराहच्या हातात विसवणार असेच वाटले होते. पण बुमराहने हा सोपा झेल सोडला. रविंद्र आणि मिचेल यांच्यामध्ये दीडशतकी भागीदारी झाली होती, त्यातच हा झेल सोडला. त्यामुळे विराट कोहलीसह टीम इंडियातील इतर खेळाडूंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याशिवाय स्टेडिअमधील उपस्थित प्रेक्षकांनाही यावर विश्वास बसला नाही. 



भारताच्या फिल्डिंगवर सोशल मीडियावरही ताशेरे ओढण्यात आले. नेटकऱ्यांनी फिल्डिंगवरुन मिम्स शेअर करत टीम इंडियावर निशाणा साधला. विश्वचषकात सर्वात चांगली फिल्डिंग भारताची झाली होती, तर खराब फिल्डिंग पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची झाली होती. रचित रविंद्र याने जीवनदानाचा फायदा घेत 87 चेंडूमध्ये 75 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. रचित रविंद्र याचा अडथळा अखेर मोहम्मद शामीने संपुष्टात आणला. 






































न्यूझीलंड संघाने खराब सुरुवातीनंतर दमदार कमबॅक केले. 19 धावांवर दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर रचित रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी दीडशतकी भागीदारी करत डाव सावरला. 36 षटकात न्यूझीलंड तीन बाद 197 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांना टार्गेट करत धावसंख्या वाढवली.