धरमशाला : वर्ल्डकपमधील आपल्या पाचव्या सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत आहे. न्यूझीलंडच्या 2 विकेट अवघ्या 19 धावांत पडल्या, मात्र त्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर आणि श्रीकांत यांच्या नावावर होता. या दोन्ही खेळाडूंनी 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत 136 धावांची भागीदारी केली होती, मात्र आता रचिन रवींद्र आणि डेरिल मिशेल या जोडीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


त्याचबरोबर या यादीत राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी 2003 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध 129 धावांची भागीदारी केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. यानंतर आता मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरची जोडी आहे. 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात 127 धावांची भागीदारी झाली होती. हा सामना ड्युनेडिन येथे खेळला गेला.


यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा ही जोडी आहे. विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात 116 धावांची भागीदारी झाली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना मँचेस्टरमध्ये खेळला गेला. त्याचबरोबर या यादीत पाचव्या क्रमांकावर जॉन राइट आणि ब्रूस एडगरची जोडी आहे. 1979 च्या विश्वचषकात जॉन राइट आणि ब्रूस एडगर यांनी भारताविरुद्ध 100 धावांची भागीदारी केली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना लीड्समध्ये खेळला गेला.


रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलच्या खेळीने चेहरे पडले 


रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी केलेल्या 159 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळाले. 25 ते 35 षटकांच्या षटकांच्या खेळीत टीम इंडियाच्या फिल्डींगमध्ये चुका झाल्याच, पण रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेलने केलेल्या फटकेबाजीने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. त्यामुळे मैदानासह प्रेक्षकांमध्येही सन्नाटा पसरला. विराट कोहली, शुभमन गिल, रोहितसह सर्वांचेच चेहरे पडले होते. काही काळ विराट आणि रोहितमध्ये फिल्डिंगवरून किंचित पारा चढल्याचेही दिसून आले. तीन झेल सुटण्यासह दोन रिव्ह्यू सुद्धा न्यूझीलंडच्या बाजूने गेले. एकटा रचिन तीनदा नशीबवान ठरला.  






 


जड्डू म्हणजेच रविंद जडेजा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अव्वल क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. जडेजाला झेल सोडताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. पण वर्ल्डकप 2023 मध्ये धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जडेजाने एक अतिशय सोपा झेल सोडला, जे पाहून त्याची पत्नी रिवाबा जडेजा देखील थक्क झाली. 






भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी रिवाबा धर्मशाला येथे पोहोचली आहे. यादरम्यान त्याने जडेजाची खराब क्षेत्ररक्षण पाहिली. जडेजाने न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रचा झेल सोडला. जेव्हा रचिनचा झेल सुटला तेव्हा तो 12 धावांवर होता आणि त्यानंतर त्याच्या जीवदानाचा फायदा घेत त्याने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 75 धावा (87 चेंडू) केल्या, त्यानंतर मोहम्मद शमीने 34 व्या षटकात त्याला बाद केले. 


तर जडेजाने शमीच्या चेंडूवर रचिनचा झेल सोडलाहोता. रचिनने शमीच्या चेंडूवर पॉइंटवर शॉट खेळला आणि चेंडू थेट जडेजाच्या दिशेने गेला, ज्याला त्याने गुडघ्यावर बसून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या हातातून बाहेर पडला. जडेजाने झेल सोडला तेव्हा कोणाचाही विश्वास बसला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या