Lowest Score T20 : आयपीएल 2024 मध्ये सध्या धावांचा पाऊल पडतोय. हैदराबाद संघानं (SRH) फक्त 58 चेंडूमध्ये 166 धावांचा यशस्वी पाठलाग केला. पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अख्खा संघ 12 धावांत तंबूत परतलाय. जपान विरुद्ध मंगोलिया सामन्यादरम्यान हा लाजीरवाना विक्रम नोंदवला गेलाय. जपानच्या भेदक माऱ्यासमोर मंगोलियाचा अख्खा संघ फक्त 12 धावांत तंबूत परतला. मंगोलियाचे सात फलंदाज शून्यावर बाद झाले. मंगोलियाच्या नावावर लाजीरवान्या विक्रमाची नोंद झाली आहे. 


सात महिन्यापूर्वी मंगोलियाचा संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मंगोलियाचा संघ आशियाई क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसला होता. पण आता जपानविरोधात मंगोलियाचा संघ फक्त 12 धावांवर तंबूत परतला. हा टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या आहे. मंगोलियाच्य आधी टी20 क्रिकेटमध्ये एक संघ 10 धावांवर तंबूत परतला होता. मंगोलियाचा 12 धावांनी खूर्दा उडवत जपानने हा सामना 205 धावांच्या अंताराने जिंकला. 


फक्त 12 धावांवर मंगोलियाचा खेळ खल्लास


मंगोलियाचा संघ सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. जपान आणि मंगोलिया यांच्यामध्ये सात सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 217 धावांचा डोंगर उभारला होता. विराट धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मंगोलियाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रांगच लागली, एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. मंगोलियाच्या 11 फलंदाजापैकी सात फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. जपानचा डावखुरा वेगवान गोलंदाज काजुमा काटो-स्टैफर्ड यानं भेदक मारा केला. त्याने 3.2 षटकात फक्त सात धावा खर्च करत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 






मंगोलियाचे संघर्षपूर्ण क्रिकेट 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंगोलियाचा प्रवास आतापर्यंत तितका चांगला राहिला नाही. मंगोलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना 27 डिसेंबर 2023 रोजी खेळला होता. नेपाळविरोधातील सामन्यात त्यांना दारुण पराभावाचा सामना करावा लागला होता. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 314 धावांचा पाऊस पाडला होता. प्रत्यत्तरदाखल धावांचा पाठलाग कऱणारा मंगोलियाचा संघ पक्त 41 धावांत ऑलआऊट झाला. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मालदीवकडून नऊ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला.


आणखी वाचा :


IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 


टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...