IND vs AUS Test Will Join Mohammed Shami : 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमी टीम इंडियात परतणार असल्याची चर्चा होती, मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा मोहम्मद शमीचे नाव त्यात नव्हते. मात्र रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर आता मोहम्मद शमीच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संघात पुनरागमन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. याची सुरुवात शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बदरुद्दीन यांनी केली होती.


मोहम्मद शमीचे बालपणीचे प्रशिक्षक मोहम्मद बदरुद्दीन यांनी त्यांच्या तयारीबद्दल सांगितले. बद्रुद्दीनच्या मते, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीनंतर शमी संघात सामील होऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बद्रुद्दीन म्हणाला, "शमीने आपला फिटनेस सिद्ध केला आहे आणि रणजी ट्रॉफीमध्येही त्याने चांगल्या विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दुसऱ्या भागात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो."


मोहम्मद शमीच्या संघर्षपूर्ण पुनरागमनाबद्दल बोलताना मोहम्मद बदरुद्दीन म्हणाला की, घोट्याच्या शस्त्रक्रिया आणि वयामुळे या वेळी रिकव्हरीला बराच वेळ लागला. यावेळी शमीला पूर्वीपेक्षा जास्त मानसिक दबावाचा सामना करावा लागला. तो अनेकदा निराशही झाला. मागील गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर झटपट पुनरागमन करणारा शमी आपले वय आणि शारीरिक स्थिती लक्षात घेऊन पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता.


मोहम्मद बदरुद्दीन म्हणाला की, शमीने मैदानात परतण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा त्याला पूर्ण आत्मविश्वास आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम वाटले. शमी हा जुन्या पद्धतीचा खेळाडू आहे जो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय मैदानात परतत नाही. दुखापती लपवून खेळण्यावर त्याचा विश्वास नाही.


बंगालकडून खेळताना शमीने मध्य प्रदेशविरुद्ध ४ विकेट घेतल्या. बीसीसीआयने शमीचा 58 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने शमीला किती मिस केले हे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये शमीच्या तगड्या गोलंदाजीचे उदाहरण पाहायला मिळते. त्याने आपल्या सीम बॉलिंगने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना खूप त्रास दिला. दरम्यान, बीसीसीआय त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात घेणार की नाही हे वेळ आल्यावर कळले. 


हे ही वाचा -


Ind v Aus 1st Test : ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर कोसळला संकटांचा डोंगर! 3 खेळाडूंना गंभीर दुखापत, विराट कोहली हॉस्पिटलमध्ये दाखल