Border-Gavaskar Trophy 2024-25 : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थ येथे पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिलाच सामना पर्थ स्टेडियमच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल, ज्याच्या तयारीसाठी टीम इंडिया घाम गाळत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात पोहोचल्यापासून टीम इंडियाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
विराट कोहली हॉस्पिटलमध्ये दाखल (Virat Kohli Injury Update)
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात विराट कोहलीकडून खूप आशा आहेत, मात्र आता त्याच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, कोहली त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याला कुठे दुखापत झाली आणि ती कोणत्या प्रकारची आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोहलीची दुखापत गंभीर ठरल्यास मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो.
सर्फराज खानला ही झाली दुखापत (Sarfaraz Khan Injury Update)
खरंतर, टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानला गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी WACA येथे भारताच्या सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना कोपरला दुखापत झाली. 'फॉक्स क्रिकेट'ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सर्फराज नेटमधून बाहेर पडताना उजवा हात धरलेला दिसत होता. यावेळी तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. मात्र, दुखापत किती गंभीर आहे हे अजून कळले नाही.
केएल राहुलने वाढवले टेन्शन (KL Rahul Injury Update)
मात्र, सर्फराजप्रमाणे केएल राहुललाही पर्थ कसोटी सामन्यापूर्वी दुखापतीचा सामना करावा लागला. शुक्रवारी सकाळी पर्थ येथे सराव करताना केएल राहुलला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यापूर्वी सेंटर विकेट मॅच सिम्युलेशन दरम्यान केएलला उजव्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे भारतातील तणाव वाढला आहे. उल्लेखनीय आहे की याआधी टीम इंडिया पर्थमध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत अ विरुद्ध इंट्रा स्क्वॉड सामना खेळणार होती पण ती रद्द करण्यात आली. यानंतर भारतीय संघाने पर्थमध्ये सेंटर विकेट मॅच सिम्युलेशनचा सराव करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा -