Mohammad Rizwan Pakistan Captain : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानची मोठी खेळी; बाबरच्या जिगरी मित्राच्या खांद्यावर सोपवली कर्णधारपदाची धुरा!
पाकिस्तान क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून बदल होत आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाने वनडे आणि टी-20 फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे.
Mohammad Rizwan Pakistan White Ball Captain : पाकिस्तान क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून बदल होत आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाने वनडे आणि टी-20 फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. बाबर आझमने नुकतेच पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर पाकिस्तान संघाने कसोटी मालिका खेळली. ज्यामध्ये शान मसूद संघाचे नेतृत्व करत होता. पीसीबीने रविवारी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. त्यावेळी त्याने आपल्या कर्णधाराचे नाव जाहीर केले नव्हते, मात्र आता पत्रकार परिषदेत त्याने कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद बाबर आझमचा मित्र मोहम्मद रिझवानकडे सोपवण्यात आले आहे. सलमान अली आगा संघाचा नवा उपकर्णधार असेल.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. बाबर आझमने एका वर्षात दोनदा पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे. 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर आणि लीग स्टेजमध्येच बाहेर पडल्यानंतर त्याने ODI आणि T20 आंतरराष्ट्रीय मधून कर्णधारपद सोडले होते.
PCB Chairman Mohsin Naqvi, selection committee members Aqib Javed and Azhar Ali, along with Pakistan's white-ball captain Mohammad Rizwan and vice-captain Salman Ali Agha's press conference in Lahore.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
Watch live ➡️ https://t.co/ou4SCVgxGl pic.twitter.com/W4QaRnWmKf
परंतु टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने त्याला पुन्हा कर्णधार बनवले होते. या काळात काही जुने खेळाडूही संघात परतले, पण याचा पाकिस्तान क्रिकेटला फायदा झाला नाही आणि संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला. या वर्ल्ड कपनंतर अवघ्या काही दिवसांनी बाबरने पुन्हा कर्णधारपद सोडले आणि आता त्याचे सर्वात जवळचे खेळाडू मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आगा यांना संघाचा नवा कर्णधार आणि उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
🚨 Announcing Pakistan's squads for the Australia and Zimbabwe tours 🚨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2024
Read more ➡️ https://t.co/vzc7iFBINJ#AUSvPAK | #ZIMvPAK pic.twitter.com/l66VW259EA
आगामी काळात रिझवानसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून तो कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कर्णधार म्हणून रिझवानने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली त्याचा PSL संघ 2021 साली चॅम्पियन बनला. त्यांचा संघ 2022 आणि 2023 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.
हे ही वाचा -
Pakistan Cricket : कर्णधार विना पाकिस्तान जाणार विदेशी दौऱ्यावर; 1-2 नाही तर 4 संघाची केली घोषणा