ICC Women’s ODI Player Rankings: आयसीसीनं नुकतीच महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केलीय. या यादीत भारताची कर्णधार मिताली राजची (Mithali Raj) चौथ्या स्थानी घसरण झालीय. स्मृती मांधनाचीही (Smriti Mandhana) आठव्या क्रमांकावरून दहाव्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार खेळी करणाऱ्या पूजा वस्त्राकरलाही (Pooja Vastrakar) मोठा फायदा झालाय. फलंदाजाच्या क्रमवारीत पूजानं तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठलीय. या यादीत ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली अव्वल स्थानावर कायम आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने दुसऱ्या क्रमाकांवर पोहचली आहे. 


महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 च्या पहिल्या पाच सामन्यांनंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली आहे. पूजानं आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 67 धावांची खेळी केली होती.या सामन्यात तिला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. याच कामगिरीच्या जोरावर तिनं आयसीसी फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतलीय. आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत ती 64 स्थानावर पोहचलीय. या यादीत स्नेह राणालाही मोठा फायदा मिळाला आहे. तिनं पूजासह सातव्या विकेट्ससाठी 122 धावांची भागीदारी केली होती. 


आयसीसीचं ट्वीट- 



वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजला तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप फायदा झाला आहे. मॅथ्यूजने फलंदाज, गोलंदाज तसेच अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात सामनावीर ठरलेल्या मॅथ्यूजनं अष्टपैलूंच्या यादीत सहा स्थानांनी झेप घेत गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha