CSK Schedule in IPL 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) रविवारी ‘आयपीएल’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय.त्यानुसार, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला (IPL 15) येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई), डी. व्हाय. पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम (पुणे) या चार ठिकाणांवर ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे. या हंगामात एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या सर्वाधिक लोकप्रिय संघापैकी एक असेलल्या चेन्नई सुपर किंग्जचे सामने कधी, कुठे आणि कोणाशी होणार? याबद्दल जाणून घेऊयात.


महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत करून चौथ्यांदा विजतेपद पटकावलं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी पाच वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. यंदाच्या हंगामात विजय मिळवून चेन्नईचा संघ मुंबईच्या संघाशी बरोबरी करेल. यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघं कधी, कुठे आणि कोणत्या संघाशी भिडणार आहे? याचं संपूर्ण वेळापत्रक पाहुयात.


चेन्नई सुपरकिंग्जचं संपूर्ण वेळापत्रक-


आयपीएलच्या साखळी फेरीतील 55 सामने मुंबईच्या वानखेडे आणि बेब्रॉर्न आणि डी.व्हाय. पाटील अशा तीन वेगवेगळ्या स्टेडिअमवर खेळवण्यात येतील. त्याचबरोबर साखळी फेरीचे 15 सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळवले जातील. तसेच प्लेऑफच्या 4 सामन्यांसाठी अद्याप ठिकाण ठरवण्यात आलेले नाही.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha