MI vs GG WIPL : महिला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स आज आमने सामने होते. हरमप्रीत कौरच्या 95 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 7 विकेट्स दारुण पराभव केलाय. कॅप्टन कौरने अशक्य ते शक्य करुन दाखवलय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात जायंट्सने मुंबईसमोर 191 धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर मुंबईकडून यास्तिका भाटिया आणि हरप्रीत कौरने जोरदार फटकेबाजी केली आणि मुंबई इंडियन्सला मोठा विजय मिळवून दिलाय. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमर खेळवण्यात आला होता. 


कॅप्टन कौरने अशक्य ते शक्य केलं


गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दयालन हेमलता 74 धावा आणि बेथ मूनीच्या 66 धावांच्या जोरावर गुजरातने 190 धावा केल्या आणि मुंबईसमोर 191 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातच्या 191 आव्हानाचा पाठलाग करताना हरमप्रीत कौरने 95 तर यास्तिका भाटीयाने 49 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या यशाचा मार्ग सुखकर झाला. हरमप्रीत कौरने 10 चौकार आणि 5 षटकार लगावत 95 धावा कुटल्या.तिच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने दिमाखदार विजय मिळवलाय. 


मुंबई इंडियन्स अंकतालिकेत पहिल्या स्थानावर 


गुजरात जायंट्सचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर झेप घेतलीये. मुंबईने गुजरातचा पराभव केल्यामुळे दिल्ली आता गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. शिवाय मुंबईने पराभव केल्यामुळे गुजरातचा संघ प्लेऑफचा रस्ता देखील बंद झालाय.  सहा सामन्यांत गुजरातने बेथ मूनीच्या नेतृत्वात केवळ 1 सामना जिंकला आहे. दोन गुण आणि -1.111 च्या स्ट्राईक रेट असलेला गुजरात जायंट्सचा संघ आता गुणतालिकेत तळाला पोहोचलाय. 


यास्तिकाची दमदार सुरुवात 


मुंबईला यास्तिका भाटीयाने दमदार सुरुवात करुन दिली. सलामीला उतरलेल्या यास्तिका आणि हेलीने 39 चेंडूमध्ये 50 धावांची भागिदारी रचली. त्यानंतर हेली मॅथ्यूजच्या रुपाने मुंबईने पहिली विकेट गमावली. तिने 21 चेंडूमध्ये 18 धावा केलाय. त्यानंतर यास्तिकाही 49 धावा करुन बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीतने निर्णायक खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला