Ravichandran Ashwin : धरमशालामध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामना हा रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना होता, जो अतिशय संस्मरणीय ठरला. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेत एकूण 9 बळी घेतले. अश्विनने काही आठवड्यांपूर्वीच आपल्या कसोटी कारकिर्दीत 500 बळींचा टप्पा गाठला होता आणि ज्या वेगाने तो प्रगती करत आहे, तो लवकरच 600 बळींचा टप्पा गाठेल, अशी आशा आहे. अश्विनने मुथय्या मुरलीधरनचा खास विक्रम मोडीत काढला आहे. 






100व्या कसोटी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी


कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. 2006 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 87 धावांत 3 बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात 54 धावांत 6 बळी घेतले होते. अशाप्रकारे मुरलीधरनने संपूर्ण कसोटी सामन्यात 141 धावांत 9 विकेट घेतल्या.






आता रविचंद्रन अश्विनने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनने 51 धावांत 4 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 77 धावांत 5 बळी घेतले. त्याने या कसोटी सामन्यात एकूण 128 धावा देत 9 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच आता अश्विनने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात खेळाडूंकडून सर्वात कमी धावा देत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.


भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत सर्वाधिक बळी


भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेवर नजर टाकली तर रवी अश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 5 सामन्यात एकूण 26 विकेट घेतल्या असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा टॉम हार्टली आहे ज्याने इतक्याच सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने या मालिकेत एकूण 2 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या