MI Emirates, UAE ILT20 : यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय लीग टी20 अर्थात IL T20 (UAE ILT20) चा पहिला हंगाम पार पडणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai indian) या लीगमध्ये MI Emirates या नावाने आपला संघ उतरवणार असून यासाठी कोणते खेळाडू संघात असतील, याबाबत नुकतीच माहिती समोर आली आहे. MI Emirates ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी संघात कायरन पोलार्डसोबत याआधी आयपीएलमध्ये मुंबई संघात खेळलेले ट्रेन्ट बोल्ट, ड्वेन ब्राव्हो हे खेळाडूही दिसणार आहेत. 






 


यूएई टी20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स एमिरेट्सने आतापर्यंत एकूण 14 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक खेळाडू हे वेस्ट इंडीज (4 खेळाडू) संघातील आहेत. त्यानंतक तीन इंग्लंडचे, तीन अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका तसंच न्यूझीलंडचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. या वेळी संघमालक आकाश अंबानी यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 14 खेळाडूंना घेऊन आम्ही आनंदी आहोत. हे सर्व जण आता आमच्या वन फॅमिलीचा भाग झाले आहेत. आम्हाला कायरन पोलार्डसोबत असण्याचा आनंद आहे. तसंच ड्वेन ब्राव्हो, ट्रेन्ट बोल्ट आणि निकोलस पूरन पुन्हा संघासोबत जोडले जात असल्याने आम्ही त्यांचं स्वागत करतो.


कसा आहे MI Emirates चा संघ?



  • कायरन पोलार्ड, वेस्ट इंडीज

  • ड्वेन ब्राव्हो, वेस्ट इंडीज

  • निकोलस पूरन, वेस्ट इंडीज

  • ट्रेन्ट बोल्ट, न्यूझीलंड

  • आंद्रे फ्लेचर, वेस्ट इंडीज

  • इमरान ताहिर, दक्षिण आफ्रिका

  •  समित पटेल, इंग्लंड

  •  विल स्मीड, इंग्लंड

  •  जॉर्डन थॉम्पसन, इंग्लंड

  •  नजीबुल्लाह जादरान, अफगाणिस्तान

  • जहीर खान, अफगाणिस्तान

  •  फ़ज़लहक़ फ़ारूक़ी, अफगाणिस्तान

  •  ब्रॅडली व्हील, स्कॉटलंड

  •  बास डी लीड, नेदरलंड 


केपटाऊन लीगसाठीही तगडा संघ


अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशीद खान (Rashid Khan), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone)  मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत, अशी माहिती आकाश अंबानीनं (Akash Ambani) दिलीय. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये हे सर्व खेळाडू मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. "आम्ही मुंबई इंडियन्सच्या संघाला आणखी मजबूत करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. राशीद खान, कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचं मुंबई इंडियन्सच्या संघात स्वागत करताना मला आनंद होत आहे." आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा डेवाल्ड ब्रेव्हिस आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन यांनाही मुंबईच्या संघानं विकत घेतलंय. आयपीएलमध्ये राशीद खान गुजरात टायटन्सकडून खेळतो. रबाडा आणि लिव्हिंगस्टोंग पंजाब किंग्जकडून खेळतात. सॅम करन चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सॅम करन आयपीएल खेळला नव्हता. 


हे देखील वाचा-