MI Cape Town, South Africa T20 League: अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशीद खान (Rashid Khan), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone)  मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत, अशी माहिती आकाश अंबानीनं (Akash Ambani) दिलीय. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये हे सर्व खेळाडू मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. 


आकाश अंबानी काय म्हटलंय?
"आम्ही मुंबई इंडियन्सच्या संघाला आणखी मजबूत करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. राशीद खान, कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचं मुंबई इंडियन्सच्या संघात स्वागत करताना मला आनंद होत आहे." आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणारा डेवाल्ड ब्रेव्हिस आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन यांनाही मुंबईच्या संघानं विकत घेतलंय. आयपीएलमध्ये राशीद खान गुजरात टायटन्सकडून खेळतो. रबाडा आणि लिव्हिंगस्टोंग पंजाब किंग्जकडून खेळतात. सॅम करन चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे. मात्र, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सॅम करन आयपीएल खेळला नव्हता. 


ट्वीट-



फाफ डू प्लेसिस पुन्हा सीएसकेकडून खेळताना दिसणार
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिर्घकाळ आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा अनुभवी स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिस पुन्हा एकदा सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. सुपर किंग्सनं त्याला आगामी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये त्यांच्या संघात करारबद्ध केलंय. फाफ डू प्लेसीसनं आयपीएलमध्ये 2010 ते 2021 पर्यंत चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.परंतु, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्याच्यावर बोली लावली.


फाफ डू प्लेसीसची कारकीर्द
फाफ डू प्लेसीसनं 69 कसोटी, 143 एकदिवसीय, 50 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 4 हजार 163 धावांची (10 शतक, 21 अर्धशतक) नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 5 हजार 507 धावा (12 शतक, 35 अर्धशतक) केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 1 हजार 528 धावा (1 शतक, 10 अर्धशतक) केल्या आहेत. आयपीएलमध्ये फाफ डू प्लेसीसनं 116 सामन्यात 2 हजार 606 धावा केल्या आहेत. ज्यात 25 अर्धशतकांचा समावेश आहे.


हे देखील वाचा-