Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. यासाठी 300 हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून आतापर्यंत बहुतांस राजकीय गटांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी भारतीय कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत रंगली आहे. मतदानाची वेळ संपली असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. 368 पैकी 343 मतदारांनी बजावला हक्कअसून काही वेळांत म्हणजेच आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल समोर येऊ शकतो.
मतदानाचा हक्क बजावलेले -
संदीप दळवी (MNS)
प्रसाद लाड (BJP)
विहंग सरनाईक (शिंदे गट)
प्रताप सरनाईक (शिंदे गट)
विजय पाटील - (Congress)
जितेंद्र आव्हाड - (NCP)
शरद पवार -(NCP)
पंकज ठाकूर -( BVA)
निलेश भोसले - (शिवसेना उद्धव गट)
मिलिंद नार्वेकर - (SS)
आशिष शेलार - (भाजप)
राहुल शेवाळे - (शिंदे गट)
क्षितीज ठाकूर - (बविआ)
सचिन अहिर - (शिवसेना ठाकरे गट)
रामदास आठवले - (आरपीआय)
ठाकरेंची मात्र मतदानाला पाठ
ठाकरे कुटुंबाकडून उद्धव, आदित्य आणि तेजस अशा तिघांना मतदानाचा हक्क होता. पण या तिघांनी म्हणजेच जवळपास संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. ज्यानंतर भाजपकडून ठाकरेंवर टीका करण्यात आली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी 'ठाकरे कुटंब संकुचित वृत्तीचे असून इथेही त्यांनी राजकारण आणलं,' असं म्हटलं आहे. पुढे बोलताना लाड म्हणाले,''ठाकरेंच्या घरातील व्यक्ती मिलिंद नार्वेकर ही निवडणूक लढवत आहेत. तसंच ही निवडणूक मुंबईतील स्थानिक क्रिकेटच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे आम्ही नार्वेकरांचा प्रचार केला आणि त्यांना आम्ही निवडूनही आणू.''
पाटील विरुद्ध काळे अध्यपदासाठी आमने-सामने
MCA अध्यक्षपदासाठी सध्या निवडणूक पार पडत असून यावेळी शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) असणार आहेत. या दोघांच्या आमने-सामने येण्याने पुन्हा एकदा क्रिकेटर विरुद्ध राजकीय पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आमने-सामना आली आहे. दरम्यान काळे यांनी 'आपण ही निवडणूक कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे, मी राजकारणी नाही किंवा माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.' असं आधीच स्पष्ट केलं आहे.
हे देखील वाचा-
MCA Election 2022 : पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले अमोल काळे आहेत तरी कोण?