Team India for T20 World Cup 2022 : भारतीय संघ (Team India) विश्वचषक (T20 World Cup 2022) सामन्यांसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. सराव सामनेही झाले असून आता थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) महामुकाबल्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये रंगणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडिया नुकतीच मेलबर्नला पोहोचली असून बीसीसीआयनं (BCCI) खेळाडूंचा मेलबर्नला पोहोचतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.


या व्हिडीओमध्ये आधी सराव सामने असणाऱ्या ब्रिस्बेन येथील एअरपोर्टवर खेळाडू हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर विमानप्रवासा करुन मेलबर्न एअरपोर्टवर खेळाडू उतरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दिसत आहे. काही ऑस्ट्रेलियन फॅन्स टीम इंडियातील खेळाडूंकडून सही घेताना तसंच सेल्फी घेताना दिसत आहेत. 


पाहा VIDEO






भारत आणि पाकिस्तान दोघांनी आपले सराव सामने खेळले असून भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी मात दिली तर पाकिस्तानचा संघ मात्र इंग्लंडकडून 6 विकेट्सनं पराभूत झाला. त्यानंतर दोन्ही संघाचे दुसरे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिले. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी झाली पण पाकिस्तानचा डाव सुरु होताच पावसाने हजेरी लावली. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाच पावसामुळे सुरु होऊ शकला नाही. आता दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.


23 ऑक्टोबरला महामुकाबला


T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. या सामन्याने दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात करतील. या दोन्ही संघांमधील गेल्या वर्षभरातील हा चौथा सामना असेल. गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने दोनदा, तर भारतीय संघाने एकदा विजय मिळवला आहे.


टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.


हे देखील वाचा-