Sooryavanshi: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) भारतासह जगभरात चाहते आहेत. महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी-20 विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी सध्या भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून काम पाहतोय. याचदरम्यान, महेंद्रसिंह धोनी रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सुर्यवंशीमध्ये (Sooryavanshi) झळकणार असल्याची सगळीकडं चर्चा सुरू झालीय. हिंदी सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांनी धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय
हे देखील वाचा- AUS vs BAN: बांग्लादेशचा दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलसाठी मजबूत दावेदारी
गुलशन ग्रोव्हर यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केले. धोनी सूर्यवंशी चित्रपटात काम करणार का? आम्ही एकाच स्टुडिओत शूट करत आहोत?' असं कॅप्शन गुलशन गोव्हर यांनी दिलंय. यामुळे महेंद्रसिंह धोनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार का? याची क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता वाढलीय.
ट्वीट-
हे देखील वाचा-PAK vs WI: T20 वर्ल्डकपनंतर वेस्ट इंडिज पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाणून घ्या
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या 14 व्या हंगामात ट्राफी जिंकलीय. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने आयपीएलचा पुढील हंगाम खेळून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केलंय. आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना क्रिकेट रसिकांच्या साक्षीने चेपॉक स्टेडिअमवर खेळणार आहे, असे धोनीने एका युट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये म्हटलंय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या 4 ट्रॉफी जिंकल्या आहेत.
सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला (शुक्रवारी) हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह यात अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही विशेष भूमिका असून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी गुलशन कुमार यांनी केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर आगळी-वेगळी चर्चा रंगली आहे.