ENG vs IND: भारत आणि इग्लंड (England Vs India) यांच्यात आज बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन (Edgbaston) येथे दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. परंतु, दुसरा टी-20 सामना एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जो भारतासाठी भारतासाठी महत्वाचा असेल. टी-20 मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या रिशेड्युल कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला होता. ज्यात भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं होतं. दरम्यान, भारताची एजबॅस्टन क्रिकेट मैदानावरील कामगिरीवर एक नजर टाकुयात. 

एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारतीय सघाचं प्रदर्शन खराब आहे. या मैदानावर भारतीय संघाला आतापर्यंत एकही कसोटी जिंकता आला नाही. तर, एकदिवसीय सामन्यातील भारताची आकडेवारी  चांगली आहे. या मैदानावर भारतानं 12 एकदिवसीय सामने खेळून सहा सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय, भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानावर एकमेव टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागला.

एजबॅस्टन मैदानावरील भारताची आतापर्यंतची कामगिरी-

सामना एकूण सामने  विजय पराभव अनिर्णित
कसोटी  8 0 7 1
एकदिवसीय  12 8 4 0
टी-20  1 0 1 0

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी भारतीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, दीपक हुडा, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, आवेश खान, रवी बिश्नोई, उमरान मलिक. 

हे देखील वाचा-