Vayu Krunal Pandya : आयपीएल सुरु असतानाच कृणाल पांड्याला सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बाप झालाय. पत्नी पंखुडी हिनं दुसऱ्या बाळाला जन्म दिलाय. कृणाल आणि पंखुडी यांनी बाळाचं नाव वायु असं ठेवलं आहे. कृणाल पांड्यानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. नेटकऱ्यांकडून कृणाल पांड्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. पंखुडी कृणाल पांड्यानं 21 एप्रिल रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. आज याबाबतची माहिती सर्वांसोबत शेअर केली.
कृणाल पांड्या आणि पंखुडी यांचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. पंखुडीनं 2022 मध्ये पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्याच नाव कवीर असं ठेवण्यात आलं होतं. आता पंखुडीनं दुसऱ्या अपात्याला जन्म दिला असून त्याचं नाव वायु असं ठेवण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएलमधून ब्रेक घेऊन कृणाल पांड्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी घरी परतला होता. आपल्या कुटुंबासोबतचा फोटो पांड्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलाय. कृणाल पांड्याला आजी-माजी खेळाडूंकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहे.
कृणाल पांड्यानं इन्स्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली. नेटकऱ्यांकडून कृणाल पांड्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत 60 हजारपेक्षा जास्त लोकांनी कृणालची पोस्ट लाईक केली आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाकडूनही पांड्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शिखर धवन आणि दिनेश कार्तिकसह इतर खेळाडूंकडूनही पांड्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यंदाच्या हंगामात पांड्याची शानदार कामगिरी -
लखनौ सुपर जायंट्ससाठी कृणाल पांड्यानं शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्यानं प्रभावी कामगिरी केली. कृणाल पांड्यानं आठ सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. त्यानं धावा रोखण्याचं महत्वाचं काम केलेय. कृणालच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा काढता आल्या नाहीत. कृणाल पांड्यानं लखनौसाठी फिनिशिंगची भूमिकाही पार पाडली. त्यानं पाच सामन्यात 58 धावांच योगदान दिलेय. आयपीएलमध्ये कृणाल पांड्याने 121 सामन्यात 1572 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्यानं एक अर्धशतक ठोकले आहे. कृणाल पांड्याने आयपीएलमध्ये 75 विकेटही घेतल्या आहेत.