Rahul Dravid, Lok Sabha Election 2024 : देशभरात आज लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. सर्वसामान्यांसोबत कलाकार, खेळाडू अन् नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजवला. राहुल द्रविड आणि मोहम्मद शामी यांनाही आपपाल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा एकदा राहुल द्रविडच्या साधेपणाची चर्चा होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच राहुल द्रविडनं रांगेत उभं राहात मतदानाचा हक्क बजावला. राहुल द्रविडच्या साधेपणाचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याआधीही राहुल द्रविड रांगेत उभं राहिल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. आज राहुल द्रविड यानं सर्वसामान्यांसोबत रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजवला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. राहुल द्रविडशिवाय मोहम्मद शामी आणि अनिल कुंबळे यांनीही आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. 


राहुल द्रविडनं बजावला मतदानाचा हक्का


राहुल द्रविड नेहमीच आपल्या साधेपणामुळे चर्चेत असतो. आजही राहुल द्रविड मतदानाला रांगेत उभा राहिला अन् त्याची साधेपणाची चर्चा सुरु झाली. राहुल द्रविडने बंगळुरुमध्ये मतदानाचा हक्क बजावला. राहुल द्रविडने डॉलर्स कॉलनीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. राहुल द्रविड मतदान करण्यासाठी सर्वसामान्य लोकांसोबत रांगेत उभा राहिला होता. याची चर्चा सुरु आहे. राहुल द्रविडनं मतदान केल्यानंतर मीडियासोबत बातचीत केली. राहुल द्रविडने सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केलेय. 






 
शामीनं बजावला मतदानाचा हक्क Mohammad Shami At Polling Booth -


भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी यानं अमरोह येथे मतदानाचा हक्क बजावला. मोहम्मद शामी आज सहसपुर अलीनगर येथे भावाकडे पोहचला. त्यानंतर कुटुंबासोबत तो मतदान केंद्रावर केला. सर्वांसोबत मोहम्मद शामी यानेही मतदानाचा हक्क बजवाला. मोहम्मद शामीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोहम्मद शामी यानं लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलेय. मतदान करणं हा सर्वांचा अधिकार असल्याचेही शामीनं म्हटलेय.