1983 World Cup : कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, तरी विजयी विश्वचषकाच्या संघात नाव, कोण आहेत सुनील वॉल्सन?
World cup 83 : भारतीय क्रिकेट संघाने 1983 विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान विश्वचषकात होतं. पण संघातील एक खेळाडूला मात्र अखेरपर्यंत मैदानात उतरता आलं नाही.
![1983 World Cup : कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, तरी विजयी विश्वचषकाच्या संघात नाव, कोण आहेत सुनील वॉल्सन? Know sunil walson who was 12th man in 1983 world cup victory indian team 1983 World Cup : कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, तरी विजयी विश्वचषकाच्या संघात नाव, कोण आहेत सुनील वॉल्सन?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/7f31dfb209f5d2b43e7bd5d92f86a97a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunil Valson in 1983 World Cup : भारतीय क्रिकेट संघाने सर्वात पहिल्यांदा 1983 साली विश्वचषक मिळवला होता. सध्या जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा संघ असणारा भारत तेव्हा मात्र नवखा होता. पण कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने हा चमत्कार केला. विशेष म्हणजे संघातील सर्वांनीच यावेळी योगदान दिलं होतं. पण संघासोबत असूनही अखेरपर्यंत अंतिम 11 मध्ये संधी न मिळालेल्या सुनील वॉल्सनबद्दल (Sunil Valson) फार कमी जणांना माहित आहे. 83 या चित्रपटातून सुनील यांच्याबद्दल अनेकांना कळालं असलं तरी सुनील यांना विश्वचषकातील संघासोबत असूनही एकदाही मैदानात उतरता आलं नव्हतं. विश्वचषकानंतर त्यांना भारतीय संघातूनही वगळण्यात आलं होतं.
तर सुनील हे एक डावखुरे मीडियम फास्ट बोलर असून वेळप्रसंगी फलंदाजीही करत. सुनील यांना 1983 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळालेली आधी एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या सुनील यांना इतकी मोठी संधी मिळाली होती. ते संघासोबत इंग्लंडला गेले देखील पण अखेरपर्यंत त्यांना एकही सामना खेळायला मिळालं नाही. विशेष म्हणजे विश्वचषकानंतर त्यांना भारतीय संघातूनही वगळण्यात आलं ज्यामुळे ते कारकिर्दीत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकले नाहीत.
कशी होती सुनील यांची कारकिर्द?
सुनील वॉल्सन दिल्ली आणि रेल्वेसाठी खेळले आहेत. त्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ओळख मिळवली. वॉल्सन यांनी प्रथम श्रेणी 75 सामन्यात 212 विकेट्स मिळवले होते. या दरम्यान सहा वेळा त्यांनी एका डावात पाच विकेट्स घेण्याची कमाल केली होती. त्यांनी या दरम्यान 10 विकेट्स घेण्याची कमालही केली होती. लिस्ट ए सामन्यांचा विचार करता सुनीलने 22 सामन्यात 23 विकेट्स मिळवले. तर प्रथम श्रेणी सामन्यातील 64 डावात 376 रनही केले होते.
हे देखील वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)