India vs Bangladesh Test Series : भारत सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागल्यानं त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचं नेतृत्व करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी हा सामना महत्त्वाचा असल्यानं भारतानं आज आक्रमक पावित्रा उचलणार असं राहुलने सामन्यापूर्वी सांगितलं होते. पण या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 22 धावा करून राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. महत्त्वाच्या सामन्यात कमी धावा करून कॅप्टन राहुल पॅव्हेलियनमध्ये परतल्याने भारतीय चाहते कमालीचे नाराज झाले असून त्यांनी एकापेक्षा एक भन्नाट मीम्स शेअर केले आहेत...


राहुल आऊट झाल्यानंतर शेअर करण्यात आलेल्या अनेक मीम्समध्ये राहुलला 'हे तुझं अॅग्रेसिव्ह क्रिकेट आहे का?' असा उपहासात्मक प्रश्न अनेकांनी विचारला असून त्याला समर्पक मीम्स शेअर केले आहेत. तसंच काहींनी केएल राहुल हा पहिला भारतीय कर्णधार असेल जो बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना गमावणार आहे. कारण भारतानं आजवर बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे राहुलमुळे ही नामुष्की भारतावर येईल असं काहीजण म्हणत आहेत. तर यातील काही खास मीम्स पाहूया...












 


हे देखील वाचा-