Andrew Flintoff Accident News: इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) याचा सरे (Surrey) शहरात भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बीबीसीच्या एका मालिकेचं चित्रिकरणा दरम्यान, फ्लिंटॉफचा भीषण अपघात (Andrew Flintoff Accident) झाला. त्यानंतर फ्लिंटॉफला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार एंड्रयू फ्लिंटॉफ आणि भारतीय क्रिकेटर युवराज सिंहचा टी20 विश्वचषकातील वाद कायम क्रिडा रसिकांमध्ये चर्चेत असतो.
इंग्लंडमधील सरे येथे बीबीसी मालिकेच्या एका भागाचे शूटिंग करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफचा भीषण कार अपघात झाला. यानंतर त्याला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, 45 वर्षीय माजी अष्टपैलू खेळाडूला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा याच वर्षी कार अपघातात मृत्यू झाला होता.
बीबीसीचा शो टॉप गीयरच्या शूटिंग दरम्यान सोमवारी फ्लिंटॉफचा अपघात झाला. बीबीसीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, "टॉप गीयर टेस्ट ट्रॅक दरम्यान सोमवारील सकाळी फ्लिंटॉफचा अपघात झाला होता. त्यानंतर क्रू आणि मेडिकल टीमनं लगेचचं फ्लिंटॉफची तपासणी केली आणि पुढच्या उपचारांसाठी त्याला एअरलिफ्ट करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं." द सन वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात फ्लिंटॉफला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. फ्लिंटॉफ ट्रॅकवर नॉर्मल स्पीडमध्ये ड्राईव्ह करत होता. दरम्यान, 2019 मध्ये टॉप गीयरच्याच एका भागाचं शुटींग करत असताना फ्लिंटॉफचा अपघात झाला होता.
पाहा व्हिडीओ : Andrew Flintoff Car Accident : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिन्टॉफच्या कारला भीषण अपघात
युवराज सिंहला दिली होती गळा चिरुन मारण्याची धमकी
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंह आणि इंग्लंडचा ऑलराऊंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ हे मैदानावरील पक्के वैरी म्हणून ओळखले जातात. फ्लिंटॉफने आयसीसी टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये युवराज सिंहला चिथवलं होतं. तेव्हा दोघांमध्ये बाचाबची झाली होती.
T20 विश्वचषक 2007 मध्ये, युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारण्यापूर्वी, फ्लिंटॉफ आणि त्याच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचाच राग युवराजनं ब्रॉडवर काढला आणि स्टुअर्ट ब्रॉडनं टाकलेल्या ओव्हरमध्ये युवराजनं सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराजनं एका मुलाखीतत बोलताना म्हटलं होतं की, "अँड्र्यू फ्लिंटॉफनं मला गळा चिरुन मारण्याची धमकी दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :