KL Rahul Wedding : स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. केएल राहुलला अनेकांनी लग्नात महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये विराट कोहली आणि धोनी यांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं BMW गाडी भेट म्हणून दिली तर धोनीनं निंजा बाइक दिल्याची चर्चा आहे. मात्र, राहुल अथवा आथिया यांच्या कुटुंबाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.
कोहलीनं दिली कोट्यवधीची गाडी -
न्यूझीडंलविरोधात एकदिवसीय मालिका सुरु असल्यामुळे विराट कोहलीला लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. पण केएल राहुल आणि आथियाला विराट कोहलीनं कोट्यवधींची BMW गाडी भेट म्हणून दिल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या BMW गाडीची किंमत 2.17 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहली आणि राहुल यांच्यात चांगली मैत्री आहे, ती अनेकदा दिसूनही आली आहे.
धोनीनं दिली बाइक -
विराट कोहलीप्रमाणेच माजी कर्णधार एमएस धोनी यानं राहुलला महागडं गिफ्ट दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, धोनीनं राहुलला कावासाकी निंजा बाइक गिफ्ट केल्याचं समोर आले आहे. या बाइकची किंमत 80 लाख रुपये इतकी आहे. माजी कर्णधार धोनी बाइकचा मोठा चाहता आहे. त्याच्याकडे जगभरातील टॉप गाड्या आहेत.
पुढील महिन्यात मैदानावर परतणार राहुल -
केएल राहुल पुढील महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बांगलादेश दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत राहुलनं भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. राहुल फलंदाजीत फ्लॉप ठरला होता. परिणामी वनडे आणि टी 20 मधील उप कर्णधारपद काढून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात राहुल पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
KL Rahul Athiya Shetty Wedding: कुणी दिलं दीड कोटींचं डायमंड ब्रेसलेट, तर कुणी दिला 50 कोटींचा फ्लॅट; राहुल-अथियाला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू
Photos: राहुल-अथियाला लग्नात काय काय गिफ्ट मिळाले?